Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : ...म्हणून परांजपेंचा वाढदिवस लक्षात; पाटलांनी किस्सा सांगताच हास्याचा धबधबा!

शर्मिला वाळुंज

Kalyan News : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. कल्याण डोंबिवलीतील एकेकाळी कट्टर विरोधक असलेले राजकीय नेते खासदार शिंदे यांच्या प्रचारासाठी एकत्र आले आले आहे. तर आता आजी माजी नेते यांना कल्याण 2014 ची लोकसभा निवडणुकीची स्मरण होत आहे. काल 16 मे रोजी श्रीकांत शिंदे यांचे संकल्पपत्राचे अनावरण झाले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांना मनसचे आमदार राजू पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परांजपे यांचा वाढदिवस आपल्या कसा लक्षात राहिला याचेही कारण सांगितले. ते ऐकल्यानंतर यावेळी एकच हास्याचा धबधबा उसळला.

मनसेचे एकमेव आमदार आमदार राजू पाटील म्हणाले, "परांजपेंचा वाढदिवस माझा एवढ्यासाठी लक्षात आहे की, बरोबर 10 वर्षांपूर्वी 16 मे ला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. तेव्हा श्रीकांत शिंदे, पराजपे आणि मी असेआम्ही तिघे उमेदवार म्हणून उभे होतो. त्यावेळी शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांना पहिला पेढा मीच भरवला होता. तो दिवस कायम लक्षात आहे. त्याच दिवशी परांजपे यांचा वाढदिवस होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार राजू पाटील यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची आठवण सांगितली. पाटील यांनी निकालाची आठवण करुन देताच शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. त्यांनीही यावेळी हसत हसत परांजपे (Anand Paranjape) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

एकेकाळचे आम्ही विरोधक - शिंदे

प्रचार करत एकत्रितपणे वावरता आम्हाला 2014 ची आठवण होते. परंतु वेळ बदलत असते. त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करत असतो. मी मध्ये माझ्या बाजूला बाजूला राजू पाटील (Raju Patil) , आनंद परांजपे बसले होते. या दोन्ही नेत्यांचे या मतदारसंघांत मोठे योगदान आहे. ते माझ्या प्रचारासाठी आले ते स्वतः त्या रथावरती असतात. पूर्ण ग्राउंड लेव्हल वर त्यांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील ते स्वतः काम करत आहेत. यावेळी मला पूर्वीचे दिवसही आठवतात. आम्ही तिघांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. पण 2024 ला काळ बदलला, आता आम्ही एकत्र आहोत, असे शिंदे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT