Devendra Fadnavis News : अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते; फडणवीसांची स्पष्टोक्ती!

Devendra Fadnavis On Irrigation Scam Allegations : त्यामुळे या खात्याचे मंत्री किंवा मुख्य म्हणून आम्ही त्यावेळी अजित पवारांवर आरोप केले. मात्र... फडणवीस स्पष्टट बोलले!
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उममुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपने सत्तासमीकरण जुळवल्यानंतर सिंचन घोटाळ्याबाबत भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत होती. भाजपच्या राज्यातील नेत्यांसोबतच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी म्हणून हिणवले.

कथित 70 हजार कोटींच्या घोट्याळ्यावर राष्ट्रवादीवर ठपका ठेवला होता. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत, सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, याचा पुनरुच्चार केला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कथित सिंचन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गैरव्यवहाराचे भाजपने आरोप करत रान पेटवले होते. हे आरोप चुकीचे नव्हते, असे आजही माझे मत आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis News
Manoj Jarange Patil News : "जास्त नाटके करू नका," जरांगे-पाटलांचा पंकजा मुंडेंना इशारा

फडणवीस (Devendra Fadnvias) पुढे म्हणाले, "राज्यातल्या विदर्भ व कोकण सिंचन महामंडळ व इतरही काही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत. तर काही व्यक्तिंविरोधात आरोपपत्रही सादर झाले आहेत. सिंचनाच्या या कामांमध्ये कंत्राट वितरीत करताना नियम आणि अटी परस्पर शिथिल करण्यात आले. त्यामुळे या खात्याचे मंत्री किंवा मुख्य म्हणून आम्ही त्यावेळी अजित पवारांवर आरोप केले."

Devendra Fadnavis News
Beed Lok Sabha : पंकजा मुंडेंसाठी मोदी, गडकरी, अजितदादांची बॅटिंग; पण फडणवीस बीडकडे फिरकलेच नाहीत!
Devendra Fadnavis News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

"यावर मी स्वत: आरोप केले होते. 2010 ते 2014 या कालावधीत आम्ही आरोप केले, त्यानंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणात चौकशीसा सुरुवात केली. मात्र या चौकशीत अजित पवार (Ajit Pawar) यांचे काही हात नसल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले. त्याचप्रमाणे प्रफुल पटेल यांच्याबाबतही काही आढळून आले नाही. शेवटी तपाय यंत्रणांवर विश्वास ठेवायलाच हवा," असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com