Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule, Navneet Rana, Atul Londhe  Sarkarnama
मुंबई

Congress on BJP : राणांना समजले, फडणवीस, बावनकुळे मात्र हवेत; काँग्रेसच्या लोंढेंचा हल्लाबोल

Sachin Deshpande

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मोदी व भाजपचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती आता परिवर्तन रोखू शकत नाही. असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपला घेरले आहे. भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार 400 पार’चा जो नारा दिला आहे तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून, भाजपचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू नका’ हे सांगून वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब करत भाजपच्या फुग्यातील हवा काढली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात अतुल लोंढे म्हणाले की, भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या प्रचार सभेतच मोदींची हवा नसल्याचे स्पष्ट केले. 2019 मध्ये मोदींची हवा असतानाही अमरावतीतून अपक्ष म्हणून निवडून आले, मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका असेच बजावले आहे. नवनीत राणा यांना वस्तुस्थिती समजलेली आहे, परंतु देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र हे समजलेले नाही, ते अजूनही हवेतच आहेत. मोदींचे नाणेच खणखणीत आहे, यावर या दोन नेत्यांचा अद्याप विश्वास आहे. 2004 मध्येसुद्धा 'इंडिया शायनिंग’ आणि ‘फिलगुड’च्या हवेत असलेल्या व अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींच्या सत्तेला सोनियाजी गांधी यांनी सुरुंग लावून सत्तेतून बाहेर कसे केले हे भाजपला कळले नाही.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमी भाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार, अशी आश्वासने 2014 मध्ये मोदींनी दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत, याचा जनतेत प्रचंड राग आहे. सुधीर मुनगंटीवार, अनुप धोत्रे या भाजप उमेदवारांना जनतेने जाब विचारला. मागील 10 वर्षांत काय केले असे प्रश्न जनता विचारत आहे. अनेक गावात भाजपचे उमेदवार व नेत्यांना हाकलून दिले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. मोदींची गॅरंटीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन सारखीच फसवी आहे. ते जरी पुन्हा आले तरी त्यांचा राजकीय आलेख घसरला आहे, एकनाथ शिंदेंच्या हाताखाली त्यांना काम करावे लागत आहे, असे लोंढे म्हणाले.

देशात आज भाजप व मोदी विरोधी हवा आहे. मोदींनी कितीही प्रयत्न केले, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, निवडणूक आयोगाचा कितीही गैरवापर केला तरी भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना त्याची जाणीव झाली तशीच नवनीत राणा यांनाही झाली आहे. काहीही असो भाजपाचे काउंटडाउन सुरू झालेले असून, लोकसभा निवडणुकीत या हुकूमशाही सरकार पराभव होऊन जनतेच्या विश्वासाचे नवीन सरकार येण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही, असेही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा

"ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतीप्रमाणेच लढायची असून, बारा वाजेपर्यंत सर्व मतदारांना आपल्याला बूथवर आणून मतदान करण्याचे सांगायचे आहे. मोदींची हवा आहे.., या फुग्यात कोणी राहू नका, गेल्या निवडणुकीत मोदींच्या लाटेत मी अपक्ष म्हणून निवडून येऊन आपला झेंडा गाडला होता, " असे विधान नवनीत राणा यांनी केले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT