Lok Sabha Election 2024 : प्रचारांच्या तोफा होणार 36 तासांत थंड !

Candidates are running to connect with the voters more and more : मतदारांशी अधिकाधिक संपर्क साधण्यासाठी उमेदवारांची सुरू आहे धावपाळ
Congress, BJP News
Congress, BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचाराच्या तोफा थंड होण्यास फक्त 36 तास उरले आहेत. त्यामुळे या काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न उमेदवारांकडून केले जात आहेत. या शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह त्यांच्या पक्षातील नेत्यांवर टीकेची झोड उठवित एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यावरच प्रत्येक राजकीय पक्षाचा भर असणार आहे.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचे मतदान महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमुर या मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पाचही मतदारसंघांत गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, येथे निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे.

त्यासाठी महाविकास आघाडी, महायुतीसह इतर राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असल्याने उद्या बुधवारी (17 एप्रिलला) सायंकाळी सहा वाजता या मतदारसंघातील प्रचार थंडावणार आहे. परिणामी या मतदारसंघातील प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress, BJP News
Thackeray Vs Shinde: आधी पक्ष, नंतर धनुष्यबाण अन् आता मशाल; शिंदे गटाकडून ठाकरेंच्या प्रचार गीतावर आक्षेप

निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने उरलेल्या काळात मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी उमेदवार तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांची मोठी धावपाळ सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या अखेरच्या टप्प्यात मतदारांना साद घालण्यासाठी आपल्या राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरविण्याची तयारी उमेदवारांनी केली आहे. राजकीय पक्षांची ही मंडळी मैदानात उतरून मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहेत. महायुतीचे राज्यातील नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभांना निवडणुकीत मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे.

फडणवीस यांनी आतापर्यंत पूर्व विदर्भासाठी 20 सभा घेतल्या असून, पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येने या मतदारसंघात सभा घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची मागणीदेखील या भागातील उमेदवारांकडून केली जात आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शिंदे दोन दिवस नागपूर येथे तळ ठोकून बसणार आहेत. शिंदे हे रामनवमीला सावनेर येथे सभा घेणार आहेत. प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याने महायुतीपाठोपाठ आता महाविकास आघाडीनेदेखील प्रचाराची जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी जाहीर सभा आणि गाठीभेटींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

R

Congress, BJP News
Vishal Patil News : 'कितने भी तू करले सितम, हस हस के सहेंगे हम, ये प्यार ना होंगा कम...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com