Gajanan Kirtikar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Gajanan Kirtikar News : लोकसभेच्याआधी गजानन कीर्तिकरांचा निकाल लागणार? निलंबन की हकालपट्टी होणार?

Gajanan Kirtikar On Amol Kirtikar : गजानन कीर्तिकरांनी अमोल कीर्तिकरांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून केला जात आहे.

Akshay Sabale

Mumbai News, 28 May : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिंदे गटानं रवींद्र वायकर (Ravindra Dhanegkar) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, अशी लढत उत्तर-पश्चिम मतदारसंघात झाली.

पण, शिंदे गटात असलेल्या गजानन कीर्तिकर यांनी सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना निवडणुकीत मदत केल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून केला गेला. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांच्याकडून केली होती. आता गजानन कीर्तिकर यांच्यावर लोकसभा निकालापूर्वी कारवाई होण्याची शक्यता आहे.

"मुलाच्या टर्निंग पॉइंटवेळी मी सोबत नव्हतो, ही खंत आहे," असं विधान गजानन कीर्तीकर ( Gajanan Kirtikar ) यांनी केलं होतं. अमोल कीर्तिकर निवडून आले, तर आनंदच होईल, असंही गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं होतं. कीर्तिकरांच्या या विधानानंतर शिवसेना आणि भाजपमधील नेते संतप्त झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ( शिंदे गट ) उपनेते शिशिर शिंदे ( Shishir Shinde ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना पत्र लिहिल गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तर, मुलाला बिनविरोध निवडून आणायचा त्यांचा कट होता, असा आरोप प्रविण दरेकरांनी गजानन कीर्तिकरांवर केला होता.

"एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची आणि समोर अमोल कीर्तिकरांना उभे करायचे. त्यानंतर जेव्हा उमेदवारी मागे घेण्याची वेळ होती, तेव्हा स्वत:ची उमेदवारी मागे घेऊन मुलाला बिनविरोध निवडून आणायचे, असा त्यांचा कट होता.

एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. वरिष्ठ नेते असल्याने त्यांना चांगली वागणूक दिली. परंतु गजानन किर्तीकरांचा उद्देश हा संशयास्पद होता. त्यातून आता हळूहळू ते सगळं बाहेर येताना दिसत आहे," असं दरेकरांनी म्हटलं.

यानंतर कीर्तिकरांवर दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल, असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं. "कीर्तिकरांच्या भूमिकेबद्दल सर्वांना संशय आहे. बोलून जरी दाखवत नसते, तरी कीर्तिकरांनी अशी भूमिका घेऊ नये, या मताचे आम्ही सर्वजण होतो आणि आजही आहोत.

मुलाच्या उमेदवारीबद्दल त्यांनी भाष्य करायलाच नको होते. कीर्तिकरांसारख्या मोठ्या नेत्यानं शांत बसणं हा त्याच्यावरचा पर्याय होता. आमच्याकडील समितीकडे कीर्तिकरांचं प्रकरण गेलेलं आहे. त्यांच्यावर दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल," अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालापूर्वी गजानन कीर्तिकरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकरांना पक्षातून निलंबित करतात की त्यांची हकालपट्टी करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT