Ajit Pawar, Rohit Pawar, Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

NCP News: रोहित पवारांच्या 'त्या' पोस्टचा आधार घेत आव्हाडांनी अजित पवार गटाला डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Jitendra Awad On Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो वापरण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. मात्र, तरीही फोटो वापरला तर तुम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले 'घड्याळ' चिन्ह काढून घेऊ, अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात पवार यांचा फोटो वापरणार नसल्याची लेखी हमीदेखील न्यायालयाने द्यायला लावली होती. तसेच अजित पवारांनी घड्याळ चिन्ह मिळाल्याची जाहिरात पेपरमध्ये द्यावी; असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, तरीही अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. ज्याद्वारे त्यांनी अजित पवार गटाने शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव किंवा घड्याळ चिन्हासोबत "हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे" असे लिहिले नसेल तर त्याची माहिती कळवा, असे आवाहन पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे, तर रोहित पवारांचे हे ट्विट रिट्विट करत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जवळ आली आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे. परंतु, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रचार करताना काही नियम पाळावे लागणार आहेत. कोर्टाने त्यांना शरद पवारांचे नाव किंवा फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. शिवाय घड्याळ चिन्हासोबत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे लिहायला सांगितले आहे. अशातच आता अजित पवार गट न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करत नसल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे, '१९ मार्च २०२४ रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे अजित पवार गटाकडून पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्यांना, अजित पवार गटाकडून आदरणीय खा. शरद पवार साहेबांचे फोटो व नाव वापरले जात असल्याचे आणि घड्याळ चिन्हासोबत "हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे" असे नमूद न केल्याचे आढळून आल्यास तातडीने त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ आणि ठिकाणाचे नाव इत्यादी माहिती अधिकृत मेलआयडीवर पाठवा. किंवा पक्ष कार्यालयाशी संपर्क साधा.'

दरम्यान, रोहित पवारांची ही पोस्ट शेअर करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हाड यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'पाकीटमारांना पकडून द्या' असं लिहिलं आहे. आव्हाड यांच्या या ट्विटमुळे अजित पवार आणि शरद पवार गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT