raj thackeray sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींसमोरच तडाखेबंद भाषण; ठणकावून सांगितल्या '7' डिमांड

Raj Thackeray On Uddhav Thackray, Sharad Pawar : उद्धव ठाकरे आणि शरद पवार सत्तेत येणार नाहीत, असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

Akshay Sabale

Mumbai News, 17 May : महाराष्ट्रात 20 मेला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबई आणि उपनगरातील मतदारसंघात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, मोदींकडे सात मागण्याही केल्या आहेत.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार ( Sharad Pawar ) सत्तेत येणार नाहीत, असं म्हणत राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी टोला लगावला आहे. "90 च्या दशकात बाबरी मशिदीचं सर्वात मोठं प्रकरण घडलं. हजारो कारसेवक उत्तर प्रदेशात गेल्यानंतर मुलायमसिंह यादव यांच्या पोलिसांनी त्यांना ठार मारलं. शरयू नदीत प्रेत फेकून दिली. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर गेलं नाही. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर राम मंदिर बनेल, बनेल असं बोललं जातं होतं. मनात असं आलं कधी मंदिर बनणार नाही. पण, पंतप्रधान मोदींमुळे राम मंदिर होऊ शकलं. अन्यथा झालं नसते," असं राज ठाकरेंनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"काश्मीरचे कलम 370 नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान कार्यकाळात रद्द झालं. तिथे सगळे जमीन आणि जागा घेऊ शकतात. काश्मीर भारताचा भाग आहे हे सिद्ध झालं. ट्रिपल तलाकचा कायदाही मोदींनी रद्द करून टाकला. त्यामुळे हिंदुस्थानातील मुस्लिम महिलांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. अन्न-धान्य पुरवण्यापासून लस देण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या. मी या सगळ्या गोष्टींना धाडसी निर्णय मानतो," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

राज ठाकरेंच्या 7 मागण्या काय?

  • अनेक योजना राबविल्या गेल्या. पण, मी पुढील पाच वर्षांसाठी मोदींसमोर उभा आहे. पुढील पाच वर्षांत मोदींकडून महाराष्ट्राच्या अनेक अपेक्षा आहेत.

  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही पहिली अपेक्षा आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तोच सन्मान मिळेल, ही मोदींकडे अपेक्षा व्यक्त करतो. तितक्याच धाडसानं ती होईल, अशी मला अपेक्षा आहे.

  • देशावर हजारो वर्षे परकियांनी राज्य केलं. हजार वर्षामधील सव्वाशे वर्षे देशावर मराठा सामाज्र होतं. त्या मराठा सम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात मुलांना लहानपणापासून शिकवण्यात यावा. जेणेकरून हा देश कसा उभा राहिला, हे भविष्यातील पिढीला कळेल.

  • समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कधी उभा राहिल मला माहिती नाही. पण, शिवाजी महाराज यांची खरी स्मारके गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यानं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमण्यात यावी. आमचा राजा कोण होता आणि त्यानं काय इतिहास गाजवाल हे गडकिल्ल्यातून भविष्यातील पिढ्यांना कळेल. मोदींनी उत्तम रस्ते बनवले आहेत.

  • अठरा-एकोणविस वर्ष झाले मुंबई-गोवा महामार्ग तसाच खड्ड्यात आहे. तो लवकरात लवकर व्हावा.

  • देशातील संविधानाला धक्का लागणार नाही हे मोदींनी विरोधकांना खडसावून सांगावं

  • देशात लाखो, करोडो मुस्लिम आहेत. त्यांची देशावर निष्ठा आहे. मात्र काही मुठभर आहेत, जे काँग्रेस, ठाकरेंना पाठिंबा देणारे आहेत, त्यांचा उदेश फक्त दहा वर्षात डोक वर करता आलं नाही. डोक वर काढण्याचा सुलभ मार्ग कोणता, तर काँग्रेसशिवाय त्यांना मार्ग नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा देत आहेत. पण, लाखोंच्या संख्येनं मुस्लिम आपल्यासोबत आहे, त्याला शाश्वती हवी, त्याला आदर आहे, त्याला देशामध्ये काम करायचं आहे. नागरिक आहे. तो पिढ्या न पिढ्या राहणार आहे. पण हे मुठभर आहेत, ओवैसींसारख्या औलादी आहेत, त्यांचे जे अड्डे आहेत, ते अड्डे तपासून घ्या.. तिथे माणसं घुसवा. देशाची सैन्य घुसवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल.

  • मुंबई रेल्वेकडे लक्ष द्यावे आणि जास्तीत जास्त पैसे द्यावेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT