Devendra Fadnavis: फडणवीसांनी शिवाजी पार्कवरुन ठाकरेंचा सगळा हिशेबच चुकता केला; 'अर्धवटराव' म्हणत टोमण्यावर टोमणे

Mahayuti Shivaji Park Sabha: शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंची गर्जना आठवते, ती म्हणजे, "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो." कालपर्यंत उद्धव ठाकरेदेखील ही घोषणा देत होते. मात्र, इंडिया आघाडीच्या नेत्यांची याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा झाली आणि...
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर (Shivaji Park) भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थिती राहीले होते. मोदी सभास्थळी येण्याआधी रामदास आठवले, अजित पवारांच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरे या मैदानातून जी भाषा बोलायचे ती भाषा आता उद्धव ठाकरेंकडून वापरली जात नसल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. (Narendra Modi in Shivaji Park Mumbai)

सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, शिवाजी पार्कवर बोलताना बाळासाहेब ठाकरेंची गर्जना आठवते, ती म्हणजे, "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो." अशी घोषणा ऐकू यायची. शिवाय कालपर्यंत उद्धव ठाकरेदेखील ही घोषणा देत होते. मात्र, इंडिया आघाडीच्या नेत्यांची याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा झाली आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगितलं इथून पुढे ही घोषणा चालणार नाही, तुम्ही हे बदला, तेव्हापासून उद्धव यांनी ही घोषणा बंद केल्याचं फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच या मैदानावरुन बाळासाहेंबाचे शब्द ऐकू यायचे ते म्हणजे, शिवशाहीचा भगवा झेंडा, देशाला हिंदुस्थान म्हणा, कडवट हिंदू तसेच शिवरायांचे मावळे असे अनेक शब्द ऐकायला मिळायचे पण आता आम्हाला काय ऐकायला मिळतं उद्धव ठाकरेंच्या भाषणात तर अर्धवटराव, गजनी, कडेवर, बाप चोरला, पक्ष चोरला हिंदुत्व वेगळं, काँग्रेसला मत देणार, घरी बसून काम करणार , माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलिकडे आपल्याला काहीही ऐकू येत नाही.

मात्र मोदींच्या नेतृत्वात निर्माण झालेली महायुती तयार झाली आहे. तेंव्हापासून महाराष्ट्रात आणि मुंबईत परिवर्तन झालं. आम्ही मुंबईचा अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो. धारावी पुनर्विकास आम्ही सांगतो असं म्हणत फडणवीसांनी विकासकामांचा पाढा वाचला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Prakash Ambedkar News : 'ठाकरेंचा उमेदवारच त्यांची साथ सोडणार', प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा

मतांसाठी देशाचे आणि शहिदांचा अपमान करू नका

फडणवीस पुढे म्हणाले, नालायकांनो मतांसाठी देशाचे आणि शहिदांचा अपमान करू नका. आम्ही उज्जल निकमांसोबत आहोत. आता मतं भेटत नाहीत, म्हणून त्यामुळं त्यांनी लांगूनचालन सुरू केलं आहे. आता तर हिंदुहृदयसम्राट बोलणंही सोडलं आणि कॅलेंडरवर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. पाकिस्तानचे झेंडे फडकवून मतं मागायची वेळ आली असेल तर राजकारणातून बाहेर पडा, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com