Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Latest Speech: 'मुख्यमंत्री'पदासाठी मी मोदींना विरोध केला नाही; राज ठाकरेंचा बंधुवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray MNS Gudi Padwa: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली. शिवाय यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने केलेल्या नोट बंदी आणि बुलेट ट्रेन प्रकल्पावर टीका केली.

मागील अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आपली काय भूमिका मांडणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं. अशातच आज राज यांनी शिवाजी पार्कमधील गुढीपाडवा मेळाव्यातून बोलताना, "आपणाला जे आवडतं त्यावर मी टोकाचं प्रेम करतो आणि जे आवडत नाही त्याचा विरोधही टोकाचा करतो" असं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्यात बोलतान राज ठाकरे म्हणाले, "2014 साली नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा मी पहिला माणूस होतो. ज्यावेळी भाजपमधील कोणी हे बोललं नव्हतं, त्यावेळी मी बोललो होतो. पण 2014 नंतरची भाषण ऐकल्यावर वाटलं मी जे ऐकलं ते या 5 वर्षात दिसत नाहीये. नोटबंदी, बुलेट ट्रेन हे निर्णय मला पटले नाहीत. शिवाय उद्या कितीही चांगले संबंध झाले तरीही ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याला टोकाचा विरोध आणि ज्या पटल्या त्याला समर्थन करणार."

मी टोकाचं प्रेम करतो आणि विरोधही

मी महाराष्ट्रावर प्रेम करतो, महाराष्ट्रावर माणसांवर टोकाचं प्रेम करतो. त्याचप्रमाणे मी एखाद्यावर विश्वास टाकला तर टोकाचं प्रेम करतो आणि तो विश्वास तोडला तर टोकाचा विरोध करतो. त्यामुळेच 2019 मध्ये ज्या भूमिका पटल्या नाहीत त्यासाठी मी 'लावे रे तो व्हिडीओ'मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या-ज्या वेळी मोदी सरकारने चांगलं काम केलं त्यावेळी मी त्यांचं अभिनंदन केलं. आर्टिकल 370 हटवल्यानंतर अभिनंदन करणारं माझंचं पहिलं ट्विट होतं. तसेच एनआरसीच्या (NRC) बाजूने मी मोर्चाही काढला होता.

उद्धव ठाकरे आणि राऊतांप्रमाणे टीका करत नाही

माझ्यासाठी योग्य ते योग्य अयोग्य ते अयोग्य असतं. माझी टीका ही भूमिका पटली नाही तर असते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांप्रमाणे (Uddhav Thackeray and Sanjay Raut) मी मोंदीवर टीका करत नाही. मी मला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून टीका करत नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. तसंच मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला.

जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून ते माझ्याबरोबर का आले नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव यांना टोला लगावला. तसंच तुम्हाला या गोष्टी सुचतायत कारण तुमचा पक्ष तुटला, तुम्हाला सत्तेतून बाहेर काढलं म्हणून तुम्हाला हे सुचलं. परंतु मला भूमिका पटली नाही म्हणून मी बाहेर पडलो, काही मिळालं नाही म्हणून बाहेर पडलो नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT