Sushma Andhare, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024: '...त्या आता हवेत उडू लागल्या आहेत!' मनसेकडून सुषमा अंधारे यांच्या टीकेवर पलटवार

Lok Sabha Election 2024: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्या महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता.

सरकारनामा ब्यूरो

MNS On Sushma Andhare: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटात सध्या जोरदार शाब्दिक लढाई सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर सडकून टीका केली. या सभेत राज ठाकरेंनी अंधारेंचा जुना व्हिडिओ उपस्थितांना दाखवला होता. तर यानंतर सुषमा अंधारे यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं होतं. अंधारे यांनी आपल्या फेसबूकवर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, मिस्टर राज, तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे, अशी बोचरी टीका अंधारे यांनी केली. अंधारेंची ही पोस्ट मनसेच्या (MNS) चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण अंधारे यांच्या या टीकेनंतर शालिनी ठाकरे यांनी अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) म्हणाल्या, राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं नाव घेतल्याने त्या आता हवेत उडू लागल्या आहेत. त्यामुळे त्या आता काहीही बोलू शकतात. मुळात त्यांना महाराष्ट्रात कोण ओळखतं? राज ठाकरेंनी नाव घेतल्यामुळे त्या सध्या हवेत उडत आहेत. राज ठाकरेंनी भर सभेत आपलं नाव घेतल्यामुळे त्यांना खूप प्रसन्न वाटतंय, त्यांच्यात खूप उत्साह आला आहे. त्यामुळे त्या आता काहीही बोलायला लागल्या आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अंधारेंचं नाव घेतलं यातच त्यांना मोठा विजय वाटतोय. मुळात त्यांना राज ठाकरे हे काय बोलले हे कळलच नाही. या बाईचा बुद्ध्यांक (IQ) किती कमी आहे हे त्यांच्या वक्तव्यांवरून कळतंय. राज ठाकरे या बाईबद्दल बोलतच नव्हते. ही बाई का म्हणून सगळं स्वतःवर ओढवून घेतेय? राज ठाकरेंनी तिचा उल्लेख करावा इतकी ती मोठी आहे का?

ती राज ठाकरेंचं वक्तव्य स्वतःवर ओढवून घेतेय. मुळात राज ठाकरे यांनी तिच्याबद्दल बोलावं इतकी तिची लायकी नाही. ज्या प्रकारे तिने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर टीका केली होती, ती टीका शिवसैनिक आणि आम्ही सर्व हिंदू बांधव कधीच विसरणार नाहीत, अशा शब्दात मनसेने अंधारे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध ठाकरे गट यांच्यात शा‍ब्दिक वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT