Raj Thackeray : राज ठाकरे प्रचार करतात त्या उमेदवाराचा पराभव होतो; ठाकरे गटाने इतिहासच सांगितला

Uddhav Thackeray And Vaibhav Naik : राज ठाकरेंनी नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणेंना पाठिंबा देणे हाच बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Thane Political News : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 2019 मध्ये मोदींवर सडकून टीका करणाऱ्या राज यांनी यावेळी मात्र महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सभा घेताना दिसत आहेत. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरे Raj Thackeray सभा घेतात त्या उमेदवाराचा पराभव होतोच, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी राज ठाकरेंना डिवचले.

ठाकरे गटाचे उमेदावर राजन विचारे यांच्या प्रचारासाठी वैभव नाईक ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, राज ठाकरेंनी कल्याणचे श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि ठाण्याचे नरेश म्हस्के या शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुणे लोकसभेच्या उमेदवारांसाठीही सभा घेतल्या आहेत. यावरून नाईकांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

वैभव नाईक Vaibhav Naik म्हणाले, राज ठाकरे सभा घेतात त्या उमेदवारांचा पराभव होतोच होतो. हा इतिहास आहे. त्यांच्या सभा ज्या ठिकाणी झाल्या तेथे विरोधातील उमेदवार निवडून आले आहेत. तसेच आताही कल्याण आणि ठाण्यात होणार आहे. ठाण्यात सच्चा शिवसैनिक राजन विचारे आणि गद्दार अशी लढत होत आहे. ठाण्याची जनता शिवसैनिकाच्या पाठीशी आहे. गेल्यावेळी कोकणात राज यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत सभा घेतली होती, त्यावेळी आमचाच उमेदवार निवडून आला होता, याचीही आठवण नाईकांनी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Sunil Tatkare : 'पहाटेच्या शपथविधी'वरुन तटकरेंचा गौप्यस्फोट; काँग्रेसचं 'ते' विधान अजितदादांच्या लागलं जिव्हारी!

राज ठाकरेंनी भाजपचे उमेदवार नारायण राणे Narayan Rane यांच्यासाठीही सभा घेतली होती. त्यावरही नाईकांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले, नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेणे हाच बाळासाहेबांचा अपमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी Eknath Shinde नारायण राणेंना पाठिंबा देणे हाच बाळासाहेबांचा अपमान आहे. हा अपमान रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनता कदापी सहन करणार नाही, असे म्हणत राणेंचा पराभव होणार, असेही ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Raj Thackeray
Palghar Lok Sabha: नेत्यांची प्रतिष्ठा पणाला पालघरमध्ये अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा धुरळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com