Uddhav Thackeray, Ashish Shelar, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024: मुंबईकरांचा जीव घेणाऱ्याच्या मदतीने ठाकरे गटाचा उमेदवार मतदारांसमोर जातोय, शेलारांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Ashish Shelar On Uddhav Thackeray: सध्या राज्यातील राजकारण 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा (Iqbal Musa) उर्फ बाबा चव्हाणमुळे चांगलच तापलं आहे. मुंबई उत्तर पश्चिमचे ठाकरे गटाचे उमेदावर अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या फेरीत मुसा सहभागी झाल्याची एक व्हिडिओ क्लिप भाजपकडून व्हायरल करण्यात आली आहे. या क्लिपमुळे आता ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर, "मुंबईकरांचा ज्याने जीव घेतला, अशा व्यक्तीची मदत घेऊन तुमचा उमेदवार मतदारांपर्यंत जात आहे, याचा अर्थ आतंकवादाच्या मदतीने उद्धवजी तुम्ही मत मागत आहात का?" असा सवाल भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, मुंबईकर नागरिक मोदींच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना समर्थन देत आहेत. पण नागरिकांच्या समर्थनावर जणू काही निवडणूक लढवायचीच नाही असा निर्णय आणि असे मुद्दे घेऊन महाविकास आघाडी (MVA) आणि विशेषतः उबाठा सेना दिसत आहे. कसाबचे उदात्तीकरण आणि तुष्टीकरण करण्यात काँग्रेस कमी पडलं की काय? म्हणून तुम्ही त्याचं उदात्तीकरण करत आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गट आता काँग्रेसच्याही पुढे

तसंच ठाकरे गट आता काँग्रेसच्याही (Congress) पुढे गेला आहे. काँग्रेसने कसाबचं समर्थन केलं, तुम्ही तर बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या इकबाल मुसाला, ज्याचा दोष सिद्ध होऊन शिक्षा झालेली आहे, ज्याने मुंबईकरांचा जीव घेतला आहे, अशा व्यक्तीची मदत घेऊन तुमचा उमेदवार मतदारांसमोर जात आहे. याचा अर्थ दोष सिद्ध झालेला आरोपी व आतंकवाद्याच्या मदतीने उद्धवजी तुम्ही मत मागत आहात. तर मग तुम्ही मुंबईकरांना संरक्षण कसं देणार? असा सवाल करत, आतंकवाद्याच्या विरोधात एकत्र या, मुंबईच्या योद्धांच्या बाजूने एकत्र या, असे आवाहन शेलारांनी नागरिकांना केलं. शिवाय या उबाठा सेनेला आणि काँग्रेसला दंड करा, कसाब आणि मुसाचा जाहीर निषेध करा असंही शेलार यावेळी म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत इकबाल मुसा उर्फ बाबा चव्हाण दिसून आला. या प्रचार रॅलीचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपने थेट उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की ते नेमके कोणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत की 1993 च्या बॉम्बस्फोटात मुंबईकरांना जीव घेतला त्यांच्यासोबत असं भाजपने म्हटलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT