Devendra Fadnavis : अरे बापरे! पवारसाहेब उदार मनाचे...; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला

Sharad Pawar : शरद पवारांनी राज्यातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले. आता तिसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील वारे महाविकास आघाडीकडे झुकल्याचा दावाही त्यांनी केला.
Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला आहे. यात बारामती, माढा या लोकसभा हाय व्होल्टेज मतदारसंघाचा समावेश होता. या टप्प्याचे मतदान होताच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील, असा दावा केला आहे. पवारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टोला लगावला आहे. पवारसाहेब किती उदार मनाचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांनी Sharad Pawar राज्यातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता तिसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील वारे महाविकास आघाडीकडे झुकल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच राज्यात 45 पैकी 30 ते 35 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. यावर फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी आम्हाला 12-13 जागा दिल्या आहेत. अरे बापरे! किती उदार अंतकरण आहे साहेबांचं... असे म्हणत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.

फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, पुण्यात पूर्ण वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. जनतेने ठरवले आहे की पुण्यात भाजपाला निवडून द्यायचे. आता विरोधक बवचाळले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतात. त्यातूनच ते षडयंत्र रचत आहेत. काँग्रेसने पुण्यात साम - दाम - दंड - भेद अशी नीती अंगीकारली आहे. येत्या काळात काँग्रेस कुठल्याही थराला जाईल, यांची आम्हाला कल्पना असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Jalna Politics : 'स्वाभिमानी'ने पाठिंबा देताच कल्याण काळेंचा शेतकऱ्यांना मोठा शब्द; म्हणाले...

दरम्यान, बारामती Baramati मतदरासंघात मतदानादिवशी झालेल्या गोंधळाबाबत शरद पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पैशांचे वाटप झाल्याचे पवार म्हणाले. भाजपसह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. तर महायुतीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावाही पवारांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Sharad Pawar
Kalyan Loksabha Election : कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका, उपजिल्हाप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com