Narendra Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024: ...म्हणून मोदींच्या मुस्लिम लीगच्या आठवणी जाग्या झाल्या, ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray On BJP: "1940-42 मध्ये जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणारी काँग्रेस नको म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगबरोबर युती केली होती. त्यावेळी लीग देशाची फाळणी करण्याची भाषा करत होती."

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray On Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) मुस्लिम लीगशी (Muslim League) स्वातंत्र्यपूर्वकाळापासून संबंध असून, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी लीगशी युती केली होती, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला.

ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हाचं अनावरण तसेच मशाल गीत आज (16 एप्रिल) रोजी लॉन्च करण्यात आलं. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हाबाबत गैरसमज नकोत म्हणून कार्यकर्त्यांना मशाल चिन्ह घरोघरी पोहाेचवण्याचं आवाहन केलं. तसेच या वेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं.

मशाल गीत लॉन्च केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसचा (Congress) जाहीरनामा आणि मुस्लिम लीगचा जाहीरनामा सारखा असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1940-42 मध्ये जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणारी काँग्रेस नको म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगबरोबर युती केली होती. त्यावेळी लीग देशाची फाळणी करण्याची भाषा करत होती, त्यांच्याबरोबर यांनी युती केली होती. त्यामुळे त्याबाबत मोदींना (Narendra Modi) जास्त माहिती असेल आणि त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील," असा टोला ठाकरे यांनी लगावला.

तर काँग्रेसचा जाहीरनामा देशासाठी असून, तो सर्वसमावेशक असा आहे. काँग्रेसचा जाहीरनामा देशासाठी असून राज्यासाठी काही वेगळं जोडता येतंय का, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही वेगळे मुद्दे जोडता आले तर आम्ही जोडणार असल्याचंही ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निवडणूक रोख्यांचं बिंग फुटलं असून, हा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी या वेळी केला. तसेच धूळ गोळा करणारा व्हॅक्युम क्लीनर असतो त्याप्रमाणे भाजप पक्षही भ्रष्टाचारी गोळा करत फिरतो आहे, अशी बोचरी टीकाही ठाकरेंनी केली.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT