Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा जागावाटपाचा वाद भाजप आमदारांसाठी ठरणार नवी डोकेदुखी

Mahayuti News : नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा की शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचा यावरून अक्षरशः राजकीय धमासान सुरू आहे. दोन्हीही पक्षांचे वरिष्ठ नेते आपला दावा सोडण्यास तयार नाहीत.
BJP
BJPSarkarnama

Nashik, 16 April : लोकसभेचे जागावाटप महायुतीच्या घटक पक्षांनी प्रतिष्ठेचा विषय केला आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ सोडण्यासाठी विधानसभा मतदारसंघाचा शब्द घेतला जात आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या वादातून भाजपच्या आमदारांपुढे नव्या समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP
Solapur, Madha Lok Sabha : महायुतीचे राम सातपुते अन् निंबाळकरांचे शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा की शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचा यावरून अक्षरशः राजकीय धमासान सुरू आहे. दोन्हीही पक्षांचे वरिष्ठ नेते आपला दावा सोडण्यास तयार नाहीत. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाशिक मतदारसंघ अजित पवार गटालाच मिळाला पाहिजे. त्यावर आमचा हक्क आहे, असा दावा केला आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासाठी पक्षाला हा मतदारसंघ हवा आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विद्यमान खासदार आमचा असल्याने हा मतदारसंघ इतरांना देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. या मतदारसंघासाठी आम्ही सर्व प्रतिष्ठा पणाला लाऊ, असा इशारा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) प्रारंभी नाशिक मतदारसंघावर दावा केला होता. भाजपच्या तीनही आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन नाशिकचा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, असा दावा केला होता. त्यातून उमेदवार कोण? हा विषय पुढे आला. यात मतदारसंघ प्रमुख केदा आहेर, दिनकर पाटील, आमदार राहुल ढिकले यांसह विविध नावे चर्चेत होती. त्यात शेवटच्या टप्प्यात अचानक चांदवडचे आमदार राहुल आहेर यांचेही नाव पुढे आले.

BJP
Solapur Lok Sabha 2024: 'सिद्धेश्वर'ची चिमणी, मोहिते पाटील, निष्क्रीय खासदार, पुन्हा मोदी! सोलापुरात स्वागत आहे..!

लोकसभा उमेदवारी केल्यास आहेर यांचा चांदवड- देवळा हा विधानसभा मतदारसंघ रिकामा होतो. त्यामुळे चांदवड-देवळा मतदारसंघातील इच्छुकांनी डॉ. आहेर यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता आमदार डॉ. आहेर यांनी लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार डॉ. आहेर यांनी तसे जाहीर केले तरी भारतीय जनता पक्षासाठी चांदवड मतदारसंघात एक नवा प्रश्न निर्माण होईल, असे संकेत मिळाले आहेत.

छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास शिंदे गटाला या मतदारसंघातील दावा सोडावा लागेल. यामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होईल. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः खासदार गोडसे यांच्याशी चर्चा केली आहे. मतदारसंघ न मिळाल्यास गोडसे यांचे पुनर्वसन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात व्हावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात सध्या राहुल ढिकले हे आमदार आहेत. लोकसभा जागावाटपाच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीत आमदार ढिकले यांची अडचण करण्याचा हा राजकीय डाव असू शकतो.

BJP
Baramati Lok Saba 2024 : शरद पवारांचा इंदापुरात नवा डाव; हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हेदेखील एक प्रमुख दावेदार आहेत. महायुतीच्या घटक पक्षांतील नेत्यांचा खासदार गोडसे यांना विरोध आहे. तो विरोध दूर करण्यासाठी पर्यायी उमेदवार म्हणून बोरस्ते यांचे नाव घेतले जाते. बोरस्ते यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोकसभा उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. लोकसभेच्या जागावाटपात योग्य तडजोड न झाल्यास नाशिक मध्य मतदारसंघ शिंदे गट मागू शकतो. या स्थितीत येथील आमदार देवयानी फरांदे यांची वाट खडतर होण्याची चिन्हे आहेत. अशीच स्थिती भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या पश्चिम मतदारसंघाबाबत सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा वाद भारतीय जनता पक्षाला विधानसभेसाठी अडचणी निर्माण करणारा ठरण्याची चिन्हे आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

BJP
Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात महायुतीचा मास्टरप्लॅन, तटबंदी केली भक्कम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com