Congress News: Sarkarnama
मुंबई

Congress News: 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ? काँग्रेसच्या नेत्यांची हायकमांडसोबत तातडीची बैठक

Ganesh Thombare

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे 'इंडिया' आघाडीच्या तर दुसरीकडे 'महायुती'च्या नेत्यांचा बैठकांचा धडाका सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राजकारण पेटलं आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. या अनुषंगानेच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीवारी करणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्ली दौरा करणार आहेत.

काँग्रेस पक्षातर्फे न्याय यात्रा सुरु करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रभारी 4 जानेवारीला दिल्लीत हायकमांडशी चर्चा करणार आहेत. यात्रा कुठून सुरु होणार? यात्रेचे स्वरुप कसे असणार? या बरोबरच आगामी लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार ? अशा संदर्भाने या बैठकीत चर्चा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा अर्थात 'भारत न्याय यात्रा' काढण्यात येणार आहे. ही न्याय यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे या यात्रेचा फायदा देखील काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मात्र, काही दिवसांमध्ये हा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत जागा वाटपासंदर्भात बैठक घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT