Nana patole
Nana patole Sarkarnama

Nagpur winter session : शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे बोलत आहेत; नाना पटोले कडाडले

Nana patole News : नाना पटोले यांनी हातात पावसाने नुकसान झालेले धान घेऊन आणि गळ्यात कापसाची माळ घालून विधान भवनाच्या दारात प्रवेश केला.
Published on

Nagpur News : अवकाळी पावसामुळे विदर्भात धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी बरबाद झाला आहे. सत्ताधारी मात्र सुस्त आहेत, त्यांना जागे करण्यासाठी आम्ही आंदोलन करत असून, त्यांना दाखविण्यासाठी आम्ही धान आणले आहे. आता तरी हे असंवेदनशील सरकार निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. (CM, DCM Are lying about the help given to farmers : Nana Patole)

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधी महाविकास आघाडीच्या आंदोलनाने झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात पावसाने नुकसान झालेले धान घेऊन आणि गळ्यात कापसाची माळ घालून विधान भवनाच्या दारात प्रवेश केला. या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सरकारला धारेवर धरले.

नाना पटोले म्हणाले की, विदर्भात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. धानउत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकडेही सरकारच्या मंत्र्यांना वेळ नाही. कोणती मदत कोणत्या शेतकऱ्यांना दिली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री हे प्रचंड खोटे बोलत आहेत.

शेतकऱ्यांना कोणत्या हेडखाली मदत जाहीर झाली, हे जाहीर केलेले नाही. सरकारकडून जाहीर झालेले मदतीचे आकडे फसवे आहेत, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांप्रती त्यांना थोडी जरी कणव असेल तर त्यानी सभागृहात मदतीची घोषणा करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com