Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : महायुतीत राडा होण्याची चिन्हे? भाजपचे सर्वेक्षण, अनेक खासदारांची दांडी गुल होणार!

BJP Survey for Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी काही विद्यमान खासदारांची विकेट पडणार? भाजपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. एकीकडे इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपनेही कंबर कसली आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांचे महायुती सरकार आहे. या सरकारमधील सर्व घटक पक्षांना मिळून आणि एकजुटीने ही निवडणूक लढवण्याचं मोठं आव्हान या महायुतीसमोर आहे. सर्व पक्षांतील आणि नेत्यांची मनधरणी करून जिंकणारा उमेदवार उभा करणं आणि त्याच्या पाठीशी सर्व ताकद लावणं ही मोठी कसरत करावी लागणार आहे. यामुळेच भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे, तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपने ठेवले आहे. भाजपने प्रत्येक स्तरावर याची चाचपणी सुरू केली आहे. आता सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीतील प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण ताकद लावणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युलाही उघड झाल्याची चर्चा आहे.

लोकसभेसाठी भाजपने काय घेतली भूमिका? (BJP Plan for Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांना समोर एक फॉर्म्युला ठेवल्याचं बोललं जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार जुन्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. मिशन 45 साठी भाजप सर्व प्रयत्न करणार आहे. तसंच जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून एक सकारात्मक संकेत भाजपला मिळत आहे. राज्यातील महायुतीच्या कारभाराबद्दल नागरिक समाधानी आहेत. तसंच लोकसभेच्या ४८ मतदारसंघांपैकी किमान ४२ जागी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील दोन, मराठवाड्यातील दोन, उत्तर महाराष्ट्रातील दोन आणि मुंबईतील एका जागेवर उमेदवार बदलायलाच हवा, असे सर्वेक्षकांचे प्रतिपादन आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवारून महायुतीत मोठा राडा होण्याची चिन्ह आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT