Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे; राज ठाकरे कोणाला घाम फोडणार ?

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते जोरदार तयारीला लागले असून नेते मंडळींनी सभा, मेळावे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे.

Jui Jadhav

Mumbai News: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते जोरदार तयारीला लागले असून नेते मंडळींनी सभा, मेळावे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ॲक्टिव्ह मोडवर आले असून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचे दौरे वाढले आहेत. लोकसभेला मनसे देखील उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या पक्षाला घाम फोडतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (Lok Sabha Elections 2024)

आगामी निवडणुकींसाठी मनसे देखील तयारीला लागली असून राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील विविध विभागातील कार्यकर्ते येत आहेत. महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका, नगरपालिकेचे शेकडो कंत्राटी कामगार हे त्यांच्या किमान वेतन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. याबरोबरच आज ओटीटी चॅनेलचे मालिका निर्माते विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे हे विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. कोणत्या मतदारसंघात मनसेची ताकत अधिक आहे, कोणत्या ठिकाणी मनसे उमेदवार देऊ शकेल, याची चाचपणी ते करत आहेत.

राज ठाकरे स्वतः दौरे करत असून काही दिवसांपूर्वी प्रत्येक लोकसभेचा आढावा घेण्यासाठी एक समिती देखील त्यांनी गठीत केली होती. याचा अहवाल समितीने राज ठाकरेंना सोपावला आहे. त्यामुळे आता कोणता मतदारसंघ मनसे लढवणार ? कोणाला कोणत्या मतदारसंघातून संधी मिळणार ? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यासंदर्भात ठामपणे कोणीच भाष्य केलं नव्हतं. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे या चर्चा रंगल्या होत्या. पण यानंतर झालेल्या पक्षांच्या सर्व बैठकीत राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे चा' नारा लगावला. मागील काही दिवसांपासून मनसे राज्यातील टोलच्या मुद्यांवरून आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. आता निवणुकीच्या काळात राज ठाकरे कोणत्या पक्षाचे टेन्शन वाढवतात, कोणाला घाम फोडतात, हे निवडणुकीच्या प्रचारातच पाहायला मिळणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT