Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray Sakarnama
मुंबई

BJP on Shivsena : 'हिंमत असेल तर...' असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले !

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील जनतेला उत्तरं हवीत असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन प्रश्न विचारत राजकीयदृष्ट्या चांगलेच अडचणीत आणले आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक असल्याने त्यांच्यासाठी ही दोन प्रश्न अचडणीचे ठरू शकतात.

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिंमत असेल तर....असा प्रश्न करत चांगलेच डिवचले आहे. एकेकाळचा महाराष्ट्रातील जीवलग मित्र असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांना भाजप प्रदेशाध्यक्षांनी अगदी हिंमत असेल तर असे म्हणत डिवचले आहे.

डिचवण्यामागे कारणदेखील राजकीय असून, त्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची किनार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना महाविकासचा घटक असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने मुंबईत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना भाजप नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना दोन महत्त्वाचे प्रश्न विचारत डिवचले आहे.

उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर द्या उत्तर असे म्हणत बावनकुळे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. त्यात नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तुमची भूमिका काय ? हे आधी जाहीर करा, असे आव्हान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. अमित शाह यांचे आव्हान पाहता उद्धव ठाकरे यांनी याचे उत्तर देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्व विसरलेल्या आणि आता काँग्रेससमोर शरण गेलेल्या ठाकरेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल, असा इशारा आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याच बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या मुंबईतील स्वागतासाठी उद्धव ठाकरे आसुसलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही वारंवार का करता हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्याची हिंमत तरी उद्धव ठाकरे दाखवतील का, अशी विचारणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

इतक्यावर बावनकुळे थांबले नाहीत, तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला हवी आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. महाराष्ट्रातील जनतेला उत्तर हवीत असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन प्रश्न विचारत राजकीयदृष्ट्या चांगलेच अडचणीत आणले आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक असल्याने त्यांच्यासाठी ही दोन प्रश्न अचडणीचे ठरू शकतात.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाहीर सभांमधून गेल्या काळात भाजपवर जोरदार तोंडसुख घेत आहेत. असे असताना भाजप नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

उद्धवव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बेछूट आरोप करत लोकसभा निवडणुकीत राजकीय धुराळा उडवून देत आहेत.

असे असताना आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांना हिंमत असेल तर असे म्हणत दोन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय प्रतिक्रिया देतात हे येणाऱ्या काळात पाहण्यासारखे असेल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT