Sanjay Raut News : धक्कादायक! कांदा निर्यातबंदीमध्ये झाला 'गुजरात पॅटर्न' घोटाळा!

Sanjay Raut भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंपन्या स्थापन करून कांदा घोटाळा केल्याचा राऊत यांचा आरोप.
Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Vs BJP : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या वेळी भाजप नेत्यांनी कंपन्या स्थापन केल्या. त्यातून कांदा विक्री करून मोठा आर्थिक फायदा करून घेतला, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज चांदवड येथे आली. चांदवड बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा मेळावा झाला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांसह शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. काँग्रेसच्या विविध नेत्यांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सकाळी नऊला झालेल्या या मेळाव्याला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

या वेळी संजय राऊत यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी केली, या निर्यातबंदीनंतर झालेल्या कांदा विक्रीतून भाजपशी संबंधित कंपन्या व नेत्यांनी प्रचंड कमाई केली, असा आरोप केला. ते म्हणाले, कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर कोसळले, त्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र, त्याचवेळी भाजपच्या नेत्यांनी कंपन्या स्थापन केल्या कांदा निर्यात करण्यासाठी मूळ गुजरातच्या कंपनीला अधिकार देण्यात आले.

Sanjay Raut, Narendra Modi
पोलिसांनी रोखलं, राहुल गांधींच्या सभेत आमदाराला धक्काबुक्की | Rahul Gandhi | J P Gavit |

त्यांनी चढत दराने कांद्याची विक्री करून नफा कमवला अनेक व्यापारी कंपन्यांनीही यामध्ये कांदा विक्रीचे व्यवहार केले हे सर्व व्यापारी कोण आहेत हे अमित शाह यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचा कांदा काय दराने विक्री झाला. त्यांना काय त्यांना काय दर मिळाले?. किती नुकसान सोसावे लागले, याची मोठी आकडेवारी आहे. मात्र, राऊत यांनी हा प्रश्न सभेत उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत यांच्या भाषणाला शेतकऱ्यांकडून प्रतिसाददेखील मिळाला. या वेळी राऊत म्हणाले, कांदा निर्यातबंदीनंतर झालेला घोटाळा आणि 'गुजरात पॅटर्न' याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली. यामध्ये भाजपचे एकच धोरण दिसते. 'आम्हीच खाऊ' हीच नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची गॅरंटी आहे. शेतकऱ्यांना खाऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांनादेखील खाऊ देणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.

त्यामुळे आता आपल्याला ऐक्याची वज्रमूठ दाखवावी लागेल. तसे केल्यावर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा त्यांनी समाचार घेतला. या वेळी नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी या विषयाची फिरकी घेतली. राऊत यांनी "अभी नरेंद्र मोदी तो गयो, अमित शाह भी गयो" ही गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

R

Sanjay Raut, Narendra Modi
वसंत मोरेंना काँग्रेसची ऑफर, पुण्यातून खासदारकी मिळणार ? | Vasant More | Congress Pune |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com