Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
मुंबई

Loksabha Election : 'मविआ' नेत्यांमध्येच 'लढाई'; लोकसभेच्या 5 जागांवर अडली गाडी

Jui Jadhav

Mumbai Political News :

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती निवडणुकीसाठी सज्ज होताना दिसत आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडीदेखील जोरदार तयारी करताना दिसत आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये 'वैचारिक बिघाडी' दिसून येत आहे.

महाविकास आघाडीमध्ये (MVA) पाच जागांवर एकमत होत नसल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. त्यामुळे या जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये 'लढाई' सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. ( Shivsena NCP Congress )

खरेतर महाविकास आघाडीने भाजपला हरवण्याचा चंग बांधला आहे. तरीही काही ठिकाणी त्यांच्या जागा निश्चित होत नाहीत तर पाच जागांवर मविआमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. वारंवार बैठका घेऊनही या जागांचा तिढा सुटत नसल्याने आघाडीतील पक्ष या जागांवर एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याचे कळते.

त्या पाच जागा कोणत्या?

उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, रामटेक, वर्धा आणि यवतमाळ या 5 जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अजून एकमत झालेले नाही. हे कमी म्हणून की काय आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही समावेश झालेला आहे. त्यामुळे या पाच जागांवरी तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता उमेदवार निश्चित होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे प्रचार-प्रचार करायला वेळ मिळेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब कधी?

राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील पाच मतदारसंघ वगळता 43 जागांवरील जागावाटपाचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेस पक्ष 20 ते 22 जागांवर लढणार आहे. शिवसेनेला 18 जागा देण्याची चर्चा सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 ते 5 जागा देण्यात येतील. शिवाय वंचित बहुजन आघाडीला 1 किंवा 2 जागा देण्याचे निश्चित झाले असल्याचेमविआ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

फॉर्म्युला ठरला असला तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे नेत्यांच्या बैठकांच्या जोरबैठका सुरू आहेत.

सध्याच्या बैठका राज्यस्तरीय नेत्यांच्या आहेत. त्यानंतर वरिष्ठ नेते चर्चा करतील तेव्हा अंतिम निर्णय होईल.

लोकसभेच्या पाच जागांचा तिढा संपला की मविआच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल. या संदर्भात याता मविआतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा अद्याप बाकी आहेत. या आठवड्यात दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी अजून एक-दोन चर्चेच्या फेऱ्या मुंबईत होतील.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT