Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Sharad Pawar, Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

MVA Meeting : 'मविआ'च्या जागावाटपाची चर्चा सकारात्मक, पण निर्णय नाहीच; पुन्हा शनिवारी बैठक

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News :

महाविकास आघाडीची आज तब्बल चार तास बैठक झाली. या बैठकीतून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची चर्चा होती. मात्र, सकारात्मक चर्चा झाली असे सांगत 9 मार्चला पुन्हा बैठक होईल, असे मविआच्या नेत्यांनी सांगितले. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला तीन जागा देण्याचे ठरल्याची माहिती मिळते. ते लोकसभा मतदारसंघ वंचितने ठरवायचे आहेत. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हे सर्व पुढील बैठकीत ठरेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. चार तास झालेल्या बैठकीतून प्रकाश आंबेडकर दीड तासाने बाहेर पडले.

महाविकास आघाडीची (MVA) बैठक हॉटेल फोर सीझनमध्ये झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उपस्थित होते. बैठकीत वंचितला जागा देण्यावरून चर्चा झाली. दीड तासाने प्रकाश आंबेडकर बाहेर पडले तेव्हा माध्यमांनी त्यांना निर्णय झाला का असे विचारले. त्यावर 'माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसतंय, तुम्हीच सांगा' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्याचवेळी पुढच्या बैठकीत सर्व ठरेल, असेही सांगितले. (Loksabha Election)

दरम्यान, बैठकीनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्व 48 जागांवर उत्तम आणि सकारात्मक चर्चा चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्याचे सांगितले.

आव्हाड म्हणाले, प्रस्ताव नाही तर...

मात्र, आम्ही तीन जागांचा कुठलाही प्रस्ताव आंबेडकरांना दिला नाही, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्पष्ट केले. तुम्ही बोट ठेवाल ती तुमची जागा, असं त्यांना सांगितल्याचे आव्हाड म्हणाले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, एकाही जागेबाबत मतभेद नाहीत, असे संजय राऊत यांनी बैठकीनंतर सांगितले. जागावाटप आणि निवडणुकीची पुढील रणनीती आखण्यासाठी पुढील बैठक होईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 48 पैकी 39 जागांवर चारही पक्षनेत्यांचे एकमत झाल्याचे कळते. त्यामुळे 9 मार्च रोजी अंतिम चर्चा होऊन जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT