Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; ठाण्यासह 18 लोकसभेच्या मतदारसंघांत निवडणूक लढविणार..!

Thackeray group : समन्वयकांची यादी जाहीर; अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी. शिंदेंना नडणाऱ्या उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबईची जबाबदारी.

Amol Sutar

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप, काँग्रेस, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जागावाटपाचा तिढा सुटत आला असल्याचे दिसत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील 18 लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या या जागांचा प्रश्न सुटला असल्याचे दिसते.

लोकसभा समन्वयकांमध्ये ठाकरे गटाने अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आणि माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

18 लोकसभेच्या जागा लढण्याचे निश्चित?

महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समन्वयक नेमले आहेत. यामध्ये मुंबईमधील सहा जागांपैकी चार जागांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट मुंबईमध्ये चार जागा लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राज्यातील मुंबईसह एकूण 18 जागांवर निवडणूक लढण्याचे ठाकरे गटाकडून निश्चित झाल्याचे दिसत आहे.

लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे

जळगाव : सुनील छबुलाल पाटील

बुलडाणा : राहुल चव्हाण

रामटेक : प्रकाश वाघ

यवतमाळ : वाशीम - उद्धव कदम

हिंगोली : संजय कच्छवे

परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे

जालना : राजू पाटील

संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे

नाशिक : सुरेश राणे

ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर

मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस

मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी

मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर

मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे

रायगड : संजय कदम

मावळ : केसरीनाथ पाटील

धाराशीव : स्वप्नील कुंजीर

कोल्हापूर : सुनील वामन पाटील.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT