Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मंत्री छगन भुजबळ अथवा त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्य उमेदवार असेल. याबाबतचा निर्णय झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. (Nashik Loksabha News)
महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे. निवडणूक जिंकणारा उमेदवार हे जागा वाटप आणि उमेदवारीचे मुख्य सूत्र आहे. त्या दृष्टीने महायुतीचे घटक असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही प्रमुख पक्षांमध्ये एकमत झाले आहे. त्या दृष्टीने उमेदवारांच्या नावाला प्राधान्य देण्यात येत आहे. उमेदवारांच्या नावानुसार मतदारसंघाचे वाटप होईल, असे कळते. (NCP Latest News)
दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या निकटवर्तीयांच्या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. मंत्री भुजबळ किंवा माजी खासदार समीर भुजबळ यातील कोण उमेदवारी करणार याबाबतचा निर्णय मात्र अद्याप होऊ शकले नाही. लवकरच त्याबाबतचा निर्णय देखील होईल, असे सूत्रांनी सांगितले. (Loksabha Election 2024)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीच्या जागा वाटपात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षावर सहकारी पक्षांचा मोठा दबाव आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी हवी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आमदार संख्येनुसार जागा मिळाव्यात, असा नवा प्रस्ताव दिलेला आहे. त्यानुसार अजित पवार गटाला पाच ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे जेवढे विद्यमान खासदार आहेत. त्या सर्व जागा हव्या आहेत. त्यात काही विद्यमान खासदारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्याची पहिली झळ नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना बसेल, असे संकेत आहेत.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी सध्या बूथनिहाय यंत्रणा निर्माण करण्यावर भर दिला आहे. भुजबळ यांनी स्वतःची विश्वसनीय यंत्रणा प्रत्येक बूथवर निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याबाबत विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक घेऊन हे काम करण्यात व्यस्त आहेत.
भुजबळ यांच्या उमेदवारीच्या निर्णयाने या मतदारसंघात मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघातून २००९ मध्ये समीर भुजबळ हे विजयी झाले होते, त्यानंतरच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये अनुक्रमे भुजबळ हेच उमेदवार होते. यंदा पुन्हा चौथ्यांदा भुजबळ उमेदवारी करणार असल्याने ही निवडणूक महायुतीच्या दृष्टीने देखील प्रतिष्ठेची होण्याची शक्यता आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.