Sambhajinagar Dangal : Sharad Pawar
Sambhajinagar Dangal : Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sambhajinagar Dangal : राज्याची परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली; दंगलींच्या पार्श्वभूमीवर पवारांचे विधान!

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता आता चिंता वाटायला लागली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात रामनवमी (Ram Navami) उत्सवाच्या दरम्यान घडलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे वक्तव्य केले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या राड्याला धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता पवारांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार म्हणाले,"अलीकडच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात काही प्रकार घडला. इतरही काही ठिकाणी असे प्रकार घडले. आणि या प्रकारांना धार्मिक संदर्भ आहेत की काय? अशी चिंता वाटण्याची परिस्थिती होती."

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर मधील दंगलीप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संभाजी पवार (Sambhaji Pawar) हे याबाबतीत मुख्य तपास अधिकारी असतील. या दंगलीसंदर्भातला सगळा सविस्तर तपास आता केला जाणार आहे. पोलीस (Police) आय़ुक्ताकडून आता या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

या दंगलीसंदर्भात सखोल तपास व्हावा यासाठी, महत्त्वाचं पाऊल छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी उचललेलं आहे. जिल्ह्यातील किराडपुरा भागात दोन गटांमध्ये जो राडा झाला, त्यानमंतर जाळपोळची घटना घडली. या सगळ्या प्रकाराच्या सखोल तपासासाठी आता एसआयटी नेमण्यात आलेील आहे. एकूण सहा अधिकारी याचा तपास करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT