Sambhaji Nagar Dangal | मोठी बातमी : छ. संभाजीनगर दंगलीप्रकरणी 'एसआयटी' स्थापन होणार; पोलीस आयुक्तांचा निर्णय!

Chhatrapati Sambhaji Nagar : दंगलीची सखोल चोकशी होणार..
Chhatrapati Sambhaji Nagar Riot
Chhatrapati Sambhaji Nagar RiotSarkarnama
Published on
Updated on

Chhatarpati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर मधील दंगलीप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संभाजी पवार (Sambhaji Pawar) हे याबाबतीत मुख्य तपास अधिकारी असतील. या दंगलीसंदर्भातला सगळा सविस्तर तपास आता केला जाणार आहे. पोलीस (Police) आय़ुक्ताकडून आता या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Riot
Pimpri-Chinchwad : खंडणीच्या गुन्ह्यात एसीपीसह हवालदाराला दिलासा! तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

या दंगलीसंदर्भात सखोल तपास व्हावा यासाठी, महत्त्वाचं पाऊल छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी उचललेलं आहे. जिल्ह्यातील किराडपुरा भागात दोन गटांमध्ये जो राडा झाला, त्यानमंतर जाळपोळची घटना घडली. या सगळ्या प्रकाराच्या सखोल तपासासाठी आता एसआयटी नेमण्यात आलेील आहे. एकूण सहा अधिकारी याचा तपास करतील.

नेमकी दंगल कशासाठी झाली, सुरूवात कशी झाली, यामध्ये काही जणांनी जाणीवपूर्वक दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला का? यासह तिथे जे पेट्रोल बाँब आले होते, ते कुठून आल? एकाच वेळी एवढा जमाव कसा जमा झाला ? यासाठी काही कट शिजवण्यात आलं होतं का? याचे उत्तर या एसआयटीकडून मिळणे अपेक्षित आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Riot
Devendra Fadnavis On Riot: '' काही नेते भडकवणारे...''; छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारावरुन फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटांत बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर तुफान राड्यात झालं. यानंतर वाद विकोपाला गेला आणि हाणामारी, दगडफेकीसह पोलिसांच्या आणि खासगी मिळून, अशा एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com