Parliament House
Parliament House sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

सरकारनामा ब्युरो

नागपूर : "महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2014) एकत्र लढणार आहे," असे शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी गुरुवारी सांगितले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

किशोर तिवारी म्हणाले, "माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसऱ्यानंतर विदर्भाचा दौरा करणार आहेत.

पूजा चव्हाण या तरूणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोप झालेले आमदार, माजी मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या पोहरादेवीपासून उद्धव ठाकरे आपला विदर्भ दौरा सुरु करणार आहेत,"

"उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहे. एकत्र लोकसभा निवडणूक लढण्याबाबत निर्णय झाला आहे. एकनाथ शिंदे यांचा विषय संपला आता, भाजपमुक्त महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे यांचे मिशन आहे. विदर्भात २४ विधानसभा मतदारसंघाचं टार्गेट घेऊन उद्धव ठाकरेंचा दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे," असे किशोर तिवारी यांनी सांगितले.

'सन २०२४मधील लोकसभेची निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितले. त्यामुळे पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जाण्याची शक्यता बळावली आहे.

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले होते की आागामी निवडणूक एकत्रित लढण्याबाबत विचार होऊ शकतो.' ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, 'भाजपने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्ये सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आम्हाला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT