'सरस्वती' संदर्भातील विधानावर भुजबळ ठाम, म्हणाले, "मला मत मांडण्याचा अधिकार.."

chhagan bhujbal : भूजबळ यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या या विधानावर ठाम असल्याचे दिसले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं विधान नुकतेच केले आहे. (chhagan bhujbal latest news)

यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. काही संघटनांनी त्यांचा निषेध केला आहे. भुजबळ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हे विधान केले आहे. छगन भुजबळ आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. भूजबळ यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या या विधानावर ठाम असल्याचे दिसले.

Chhagan Bhujbal
PDCC Bank : अजित पवारांची महत्वाकांक्षी कर्ज योजना सुरूच राहणार की बंद होणार ?

छगन भुजबळ म्हणाले, "मी एका संस्थेच्या सभासदांसमोर बोलत होतो. मला मत मांडण्याचा अधिकार आहे. सावित्री फुले, महात्मा फुले यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळाले,"

"त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. माझे मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देशाच्या विरुध्द बोललो तर ती वेगळी गोष्ट आहे. पण, मी इतकेचे म्हटले की फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवले आहे आणि त्यांचा आम्ही आदर करायला हवा. आपण त्यांची का पूजा करत नाही. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते. सरस्वतीने आपल्याला काही शिवकवले नाही, त्यामुळे पूजनाचा प्रश्न येतोच कुठे," असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांच्या विधानावरुन राज्यात भाजपाने आक्रमक होत ठिकठिकाणी त्यांचा निषेध केला आहे. माफीची मागणी केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “”कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

नेमकं भुजबळ काय म्हणाले होते..

पुण्यातील आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. "शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला," "सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान भुजबळ यांनी केलं.

“बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात,”

“मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं ते हे सगळे इथे आहेत,” असं भुजबळ यांनी मंचावरील महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत म्हटलं. पुढे बोलताना भुजबळ यांनी, “यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात,” असंही म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com