PNG 
मुंबई

गृहिणींच्या हाताला आता गॅस दरवाढीचे चटके

महानगर गॅसने मुंबईसह इतर ठिकाणी स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसची (PNG) दरवाढ केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच गृहिणींना आता महागाईची मोठी झळ बसू लागली आहे. कारण महानगर गॅसने मुंबईसह इतर ठिकाणी स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसची (PNG) दरवाढ केली आहे. पीएनजीच्या दरात प्रतियुनिट 1.50 रुपये वाढ करण्यात आल्याने तो आता प्रतियुनिट 38 रुपयांवर पोचला आहे.

महानगर गॅसने पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. पीएनजीच्या दरात प्रति घनमीटर 1.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांत चार वेळा पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे पीएनजीचा दर प्रति घनमीटर 38 रुपयांवर गेला आहे. आगामी काळात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.

सीएनजीच्या दरातही मुंबईत वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅसने ही दरवाढ काल मध्यरात्रीपासून लागू केली आहे. सीएनजीच्या दरात मुंबईत चालू वर्षात तब्बल 16 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सीएनजीवर वाहन चालवणाऱ्या 8 लाख वाहनचालकांना मोठा फटका बसू लागला आहे. तीन आठवड्यांत महानगर गॅसने केलेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ केल्याने तो आता 63.50 रुपयांवर पोचला आहे.

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली आहे. यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी, बस आणि रिक्षांसोबत खासगी कारचालकांना होत आहे. स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड यामुळे बसू लागला आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा संघटना आता भाडेवाढ करण्याची मागणी करू लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT