चिंता वाढली! बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तीलाच ओमिक्रॉनची बाधा

कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे.
Omicron
Omicron Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशातल्या 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोस देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. असे असले तरी बूस्टर डोस (Booster Dose) घेतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची बाधा झाल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधून भारतात परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने फायझरच्या कोरोना लशीचे तीन डोस घेतले आहेत. विमानतळावर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अखेर त्याला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्याच्या संपर्कातील दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Omicron
आर्यन प्रकरण वानखेडेंना भोवणार; मुदतवाढीऐवजी नवीन वर्षात दीर्घ सुटी?

जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहे. काही देशांमध्ये आता कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस दिला जात आहे. भारतातही तो देण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबतही त्याचवेळी निर्णय जाहीर होईल. बूस्टर डोस देण्याबाबतचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू असून, याची सुरवात जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे.

Omicron
परमबीरसिंह प्रकरणात मोठी घडामोड : फरार विनयसिंह अखेर सापडला

देशातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या मागील 24 तासांत शंभरावर पोचली आहे. ओमिक्रॉन रूग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. शंभरपैकी 40 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राजधानी दिल्लीत 22 रूग्ण आहेत. तर राजस्थानमध्ये 17 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त करीत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com