kisan sabha agitation today  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2024: विधान भवनाबाहेर दूध ओतले! शेतकरी आक्रमक, दूध दरवाढीचे पडसाद विधिमंडळात

kisan sabha agitation today Vidhan Sabha Monsoon Session Live: शेतकऱ्यांना मदत करा. विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांवर टीका केली. खतावर, दुधावर सरकारे जीएसटी लावला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

Mangesh Mahale

गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून 40 रु प्रति लिटर इतके करावे. अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत. त्यांचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आंदोलकांनी विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन केले. आम्हाला निकष सांगू नका. शेतकऱ्यांना मदत करा. विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विरोधकांवर टीका केली.

खतावर, दुधावर सरकारे जीएसटी लावला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकार या मागणीला गांभीर्याने घेत नाही असं शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर 'किसान सभा' राज्य व्यापी आंदोलन करीत आहे.

प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा त्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा, दूध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये करावे, अनुदान बंद असताना दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे आदी मागण्या संघर्ष समितीने केल्या आहेत.

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात आंदोलन करण्यात आले.

दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT