MLAs Bhaskar Jadhav and Sachin Kalyanshetti seen during the Maharashtra Assembly Budget Session as a viral video of their verbal clash sparks controversy. Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly : भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टींमध्ये जोरदार राडा : एकमेकांच्या वडिलांचा उद्धार करत बाचाबाची

Bhaskar Jadhav vs Sachin Kalyanshetti : विधानसभेच्या पोर्चमध्ये दोन आमदार एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये ही शा‍ब्दिक बाचाबाची झाली आहे. यावळी दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या बापाचा उल्लेख केला.

Jagdish Patil

Mumbai News, 04 Mar : विधानसभेत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आज बुधवारी (ता.04) विधानसभेच्या पोर्चमध्ये दोन आमदार एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना घडली.

या दोन्ही आमदारांनी थेट एकमेकांचा बाप काढला असून याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये ही शा‍ब्दिक बाचाबाची झाली आहे.

यावेळी दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या बापाचा उल्लेख केला. मिळालेल्या माहितीनुसार, विधान भवनातील सभागृहात प्रवेश करण्याआधी जी सही करावी लागते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. तर इथेच सही करण्यावरून या दोन्ही आमदारांमध्ये शाब्दीक चकमक झाली.

याबाबतचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये भाजपचे अक्कलकोटचे आमदार भास्कर जाधव यांना, "बाप कशाला काढायला लागलाय, तुम्हाला बाप काढायचा अधिकार आहे का?" असं म्हणताना दिसत आहेत. त्यावर भास्कर जाधव, 'हो, आहे' असं म्हणतायत.

त्यावर कल्याण शेट्टी, "तुम्ही माझा बाप काढला तर तुमचा बाप काढणार. बाप काढायला नको होता", असं म्हणतात. त्यावर "तुम्हाला माझा काढायचा असेल तर काढा", असं भास्कर जाधव म्हणत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून आमदारांच्या भाषेवर आणि वर्तवणुकीवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात विधान भवनात वाद झाला होता.

त्यानंतर आता आणखी दोन आमदार एकमेकांना भिडल्याने आमदारांना राज्याच्या विधान भवनात कसं वागावं याचं प्रशिक्षण देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT