Vinod Tawde Sarkarnama
मुंबई

Vinod Tawde : मोदी-अदानी संबंधांचा राहुल गांधींनी 'सेफ' उघडला; भाजपच्या तावडेंचा आमच्याकडे 'कपाट'भर असल्याचा इशारा ...पाहा VIDEO

Vinod Tawde responds to Rahul Gandhi's Mumbai press conference: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांना भाजप नेते विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँगेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत 'एक है तो, सेफ है' या घोषणेबरोबर भाजप आणि अदानीवर यांच्या संबंधांवर मार्मिकपद्धतीने केलेली टीका भाजपला चांगलीच झोंबली.

यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर पलटवार केला. काँग्रेस राज्य असलेल्या मुख्यमंत्रींची अदानींबरोबर छायाचित्र दाखवून तिथे केलेल्या व्यावसायिक गुंतवणुकीचे दाखले दिले. तसेच 'एक है, तो सेफ है', ही घोषणा सकारात्मक आहे, असा टोला देखील त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

भाजप (BJP) नेते विनोद तावडे यांनी अदानी आणि काँग्रेसचे नाते जुने आहे. हे सांगताना अदानी आणि वाड्रा यांची एकत्रित फोटो दाखवले. अदानीची खरा उदय 2014 अगोदर झाल्याचा दावा केला. हे सांगताना त्यांनी चिमणभाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट दिला. अदानी यांनी देखील मुलाखतीत सांगितले आहे की, त्यांची ग्रोथ राजीव गांधी यांच्या काळात झाली. लवचित धोरण राजीव गांधींनी आमच्याबाबतीत ठेवली. अदानींचा सगळ्यात जास्त विकास देशात, विदेशात होण्यासाठी सरकारची कशी मदत झाली, 2014 अगोदर आणि नंतर मिळाले प्रोजेक्टची लिस्ट तावडे यांनी वाचून दाखवली.

जातीय सर्वेक्षणाच्या मागणीवरून फटकारले

राहुल गांधी (Rahul Gandhi) भाजप आणि मोदी यांचे नाते जोडत आहेत, ते खरं नाही. खरे म्हणजे, 'एक है तो सेफ है', हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है, ही घोषणा देताना, राहुल गांधी यांनी जातीय सर्वेक्षणाची मागणी करून, 'जसकी जिनकी भागीदारी, उसकी उनकी हिस्सेदारी', ओबीसी समाजाला एकूण आरक्षण 29 टक्के असेल, तर त्यात माळी समाजाला अडीच टक्केच आरक्षण मिळणार, असा प्रत्येक जातीला पूर्ण आरक्षण न देता, त्या-त्या टक्केप्रमाणे आरक्षण देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे, म्हणून जातीय सर्वेक्षणाची मागणी करत आहेत. जातीय सर्वेक्षणात विभागू नका, म्हणून 'एक है तो सेफ है', हे त्यातले आहे, असा दावा विनोद तावडे यांनी केला.

काश्मीर पंडित एक राहिले पाहिजे होते

जम्मू-काश्मीरमध्ये एक राहिले असते, तर काश्मीर पंडित सेफ राहिले असते, असे सांगत तिथले वास्तव सर्वांना माहित आहे. त्यामुळे देशभरातील उदाहरणे देता येतील, आणि एक है तो सेफ आहे, हा नारा सकारात्मक असाच आहे. राहुल गांधी यांनी देखील तो सकारात्मक घ्यावा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.

धारावीची जमीन सरकारचीच

मुंबईतील धारावीची जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. ती महाराष्ट्र सरकारच्या ताब्यातच राहणार आहे. ही जमीन विकासासाठी दिली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या निविदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आली होती. त्यावेळी अदानी आणि अबुदाबीमधील एका कंपनीने निविदा दाखल केली होती. धारवीमधील लोकांना त्यांची घरे मिळणार, असा ठाम विश्वास यावेळी विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जे अधिकृत नाही, त्यांना देखील घरे दिली जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT