Rahul Gandhi : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत फोडला तिजोरी बॉम्ब; दोन फोटो दाखवत मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi press conference exposes Modi with photos: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असून राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. भर पत्रकार परिषदेत त्यांनी एक तिजोरी आणत त्यातून पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानींचे फोटो दाखवत निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत आणण्यात आलेल्या तिजोरीवर ‘एक है तो सेफ है’ हा नारा लिहिण्यात आला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी तिजोरी उघडत त्यातून दोन फोटो बाहेर काढले. त्यातील एका फोटोवर मोदी आणि अदानींचा एकत्रित फोटो होता. त्यावरही हाच नारा लिहिण्यात आला होता. दुसऱ्या फोटोमध्ये धारावीचा निकाशा होता. त्यावरून राहुल यांनी मोदींनी टीका केली.

Narendra Modi, Rahul Gandhi
Manipur Violence : ‘एनडीए’मध्ये फूट; मणिपूर हिंसेमुळे नाराज मित्रपक्षाने काढला सरकारचा पाठिंबा, भाजपसमोर संकट

राहुल गांधी म्हणाले, धारावीमध्ये एक लाख कोटी रुपयांचा धंदा सुरू आहे. एक नरेंद्र मोदीजी, अदानीजी सेफ आहेत. धारावीतील जनेतेचे नुकसान होणार आहे. एका व्यक्तीसाठी येथील उद्योग संपवले जाणार आहेत. मोदींनी योग्य नारा दिला आहे. धारावीतील लोक तिथे वर्षानुवर्षे राहतात. लघु आणि मध्यम उद्योगांचा हब आहे. ही त्यांची जमीन आहे. पुर्नविकासाचे पूर्ण काम एका व्यक्तीकडून केले जात आहे.

संपूर्ण राजकीय व्यवस्था एका व्यक्तीच्या मदतीसाठी आहे. ही धारावीच्या जमिनीची चोरी आहे. याच व्यक्तीला देशातील विमानतळं दिली जात आहेत. पंतप्रधानांचे जुने नाते आहे. त्यांच्या मदतीशिवाय धारावी लोकांच्यापासून दूर नेली जाऊच शकत नाही. महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रातील लोकांना मिळणार की एका व्यक्तीला, हा प्रश्न आहे, असा जोरदार निशाणा राहुल गांधींनी साधला.

Narendra Modi, Rahul Gandhi
Chhagan Bhujbal : ...अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले!

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातून इतर राज्यांत अनेक प्रकल्प गेल्याचा दावा करत त्याची यादीच वाचून दाखवली. सात लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. या प्रकल्पांमुळे पाच लाख रोजगार निर्मिती होणार होती. पण महाराष्ट्रातील सरकारने ते होऊ दिले नाही. महाराष्ट्राच्या संपत्तीवर निशाणा साधला जात असून युवक, मजूर, शेतकऱ्यांचे स्वप्न हे सरकार तोडत आहे, असल्याची टीका राहुल गांधींनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com