Balasaheb Thackeray Memorial Day  Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray Memorial Day : मोदींच्या चॅलेंजला राहुल गांधीचं उत्तर; बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून पंतप्रधानांना केलं निरुत्तर

Congress Rahul Gandhi PM Narendra Modi social media Balasaheb Thackeray memorial day : शिवसेनाप्रमुख तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची समाज माध्यमांवरील पोस्ट चर्चेत आली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीला शिवसेनाप्रमुख तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव काँग्रेस घेत नसल्यावरून महाविकास आघाडीला डिवचत होते. परंतु पंतप्रधानांना गांधी बहिण-भावांनी निरुत्तर केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने राहुल गांधी यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणारी पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली आहे. विशेष म्हणजे, गांधी यांनी ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अगोदर शेअर केली आहे. ही पोस्ट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरुत्तर केल्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेनाप्रमुख तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून, त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत नाहीत. आदर करत नाहीत, अशी टोलेबाजी केली होती. परंतु आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात राहुल गांधी आघाडीवर राहिले. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर 12 वाजून 26 मिनिटांनी पोस्ट शेअर केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक वाजून 10 मिनिटांनी पोस्ट शेअर केली. राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी रिप्लाय देत, जय महाराष्ट्र! असे म्हंटले आहे.

हिंदूहृयसम्राट तथा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा त्यांच्या पश्चात देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसतो. यंदाची ही निवडणूक वेगळ्याच राजकीय समीकरणांमधून घडत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षाच्या फुटीनंतर, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हे दोन्ही पक्ष वेगवेगळे होऊन लढत आहेत. यात शिवसेना सर्वाधिक चर्चेत आहेत. कारण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करण्याची स्पर्धा लागलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचलं होते. आता त्याला काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसच्या मुंबईनामावर बाळासाहेबांचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला काँग्रेसकडून नेत्या प्रियांका गांधी यांनी जोरदार उत्तर दिले. शिर्डी इथल्या सभेत मोदीजी सून लीजिए बाळासाहेब ठाकरेंका नाम, असे म्हणत आव्हान दिले. यानंतर या मुद्यावर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. मुंबईची स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरले. एकप्रकारे भाजपची या मुद्यावर काँग्रेस पहिल्याच पातळीवर कोंडी केली.

राहुल गांधी यांची समाज माध्यमांवर पोस्ट

यानंतर राहुल गांधी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारी पोस्ट त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट केली. ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 40 मिनिटं अगोदर शेअर केली. राहुल गांधी यांची पोस्ट शेअर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पोस्ट शेअर झाली. राहुल गांधी यांनी इथं देखील मोदींना निरुत्तर केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी 'जय महाराष्ट्र', असा रिप्लाय दिला आहे. राऊतांनी हा टायमिंग साधून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस सहविचाराने चालत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT