Aditya Thackeray : 'गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढताना दिसतात'; आदित्य ठाकरेंचा आमदारांच्या बंडखोरीवर मोठा गौप्यस्फोट

ShivSenaUBT Party YuvaSena Aditya Thackeray Mumbai Gujarat MNS Mahayuti : आदित्य ठाकरे यांनी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मुंबईत सभा घेतल्या. यावेळी त्यांनी सर्वाधिक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपाठोपाठ भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टार्गेट केले.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आदित्यांच्या निशाण्यावर मुंबईत मनसे राहिली. मनसे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांपेक्षा ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहे, अशी बोचरी टीका आदित्य यांनी केली. तसंच शिवसेनेतील आमदार फुटीवर देखील आदित्य यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईत प्रचाराचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत त्यांनी त्याच्या मतदारसंघासह मुंबईतील इतर मतदारसंघात उभे असलेल्या 'शिवसेनाUBT' पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहे. मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रचार शेवटच्या टप्प्यात येताच, आदित्य यांनी टीकाचा सूर वाढवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपाठोपाठ, भाजप आणि मनसेवर सर्वाधिक टीका करत आहेत. यातूनच त्यांनी गुजरातच्या हितरक्षकांच्या मदतीसाठी मनसे काम करत असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

Aditya Thackeray
MP Supriya Sule : संगत लय वाईट, देवाभाऊ त्यातूनच बिघडले; खासदार सुळेंचा अजितदादांना टोला

आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रावरील गुजरातचे प्रेम सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रातील रोजगार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजराला नेले. त्या भाजपला मनसेने लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला. विधानसभेला मनसे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढते, असे वाटायचे, ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते आहे, असे दिसते".

Aditya Thackeray
Uddhav Thackeray : महिलांचा अपमान करणाऱ्या आमदाराच्या प्रचारासाठी PM मोदी आले; उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरून सुनावले... पाहा VIDEO

आदित्य ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आलेल्या प्रकल्पांची यादी सांगितली. पुणे इथल्या तळेगावमधील वेदांत-फाॅक्सकाॅन सेमिकंडक्टर प्रकल्प, मुंबईतील आर्थिक विकास केंद्र, रोहा इथला ड्रग पार्क, वैद्यकीय उपकरण निर्मिती संकुल, हिरे बाजार, असे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात असताना मनसेने भूमिका घेतली नाही. उलट गुजरातच्या हिताचे रक्षण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांरी महायुतीला मनसेने मदत करत असल्याचे दिसते, असा घणाघात केला.

शिवसेना फुटीवर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेत फूट पडल्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका होते. आमदारांमध्ये पक्ष नेतृत्वाविषयी नाराजी होती, असे सांगितले जाते. पण ते कारण नसून, आमदारांचे पैशांचे स्त्रोत बंद केल्याने ते नाराज होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल काही आमदार बदलीचे कामे घेऊन यायचे. मात्र ठाकरेंनी पैसे घेऊन बदल्या करण्यास नकार दिला. याशिवाय अनेक गैरमार्गाने पैसे मिळवण्याचे साधन बंद केले, यातून पक्षातील आमदार पळाले, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com