Maharashtra Vidhansabha Election 2024 Sarkarnama
मुंबई

Election Commission Big Decision: मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाची भन्नाट आयडिया; राजकीय पक्ष खूष, पण 'त्या' मतदारांचं काय?

Election Commission Announced Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत आयोगानं निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

Deepak Kulkarni

Maharashtra News : ज्या घोषणेकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते, त्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मोठी घोषणा करतानाच महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पण आयोगाने एकीकडे निवडणुकांच्या तारखांची घोषणा करतानाच राजकीय पक्षांना मोठा दिलासा आहे. राजकीय पक्षांची मोठी मागणी मान्य केली आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) एकूण 9 कोटी 63 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला शनिवार,रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये, अशी मागणी केली होती. जोडून सुटी आल्यानंतर मतदारराजा मतदान करण्याऐवजी फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर गावी निघून जातात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत मोठी घट होऊन राजकीय पक्षांना मोठा फटका बसतो. राजकीय पक्षांची ही मागणी विचारात घेत आयोगाने बुधवारी मतदान (Voting) प्रक्रिया ठेवली आहे.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 9 कोटी 63 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 93 लाख तर महिलांची 4 कोटी 60 लाख आहेत. 20 लाख 93 हजार मतदार यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. राज्यात एकूण 12 लाख 5 हजार ज्येष्ठ मतदार असून दिव्यांग 6 लाख 2 हजार मतदार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत आयोगानं निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

तसेच, 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आयोगानं निवडणुकीचं ‘बिगुल’ वाजवल्यानं राज्यात आचारसंहिता लागली आहे.29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्रासोबत झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला 81 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. मागील निवडणूक डिसेंबर 2019 मध्ये झाली होती. यावेळी एक महिना आधी निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. राज्यात दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT