Vijay Wadettiwar : 'राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या नियुक्त्या'; विजय वडेट्टीवारांचा महायुतीला सरकारला दिलाय इशारा

Leader of Opposition Vijay Wadettiwar: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आलेल्या सात सदस्यांवरून कोणाता इशारा दिला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेवर महायुती सरकारकडून सात आमदारांची करण्यात आलेली नियुक्तीची बेकायदेशीर असल्याचा दावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

'न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर 23 ऑक्टोबरला निकाल येणार होता. या नियुक्त्या असंविधानिकपद्धतीने झाल्या असून, याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागू', असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, "न्यायालयात प्रलंबित असलेल्या 23 ऑक्टोबरला यावर निकाल देणार होती. तरी देखील राज्यपालांकडे नाव पाठवले. सात आमदारांची नियुक्ती करून घेतल्या. असंविधानिकपद्धतीने या नियुक्त्या होत आहेत. आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्याय मागणार आहोत". या सात आमदारांची नियुक्ती करायची होती, त्यामुळेच त्यांनी निवडणूक पुढं ढकलली, असा संशय आम्हाला आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले.

Vijay Wadettiwar
Balasaheb Thorat : निवडणूक आयोगाची प्रेस; थोरात म्हणाले, 'जनतेच्या पैशातून महायुती सरकारचा राजकीय प्रोपोगंडा'

निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. परंतु तशी भूमिका दिसत नाही, असा देखील टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. "निवडणूक आयोगाने दहा दिवस राज्य सरकारला सूट दिली. यातून सरकारची जाहिरातबाजी सुरू होती. सरकारची तिजोरी साफ करण्याचे काम झाले. निवडणूक (Election) लागू द्या. यांना मत मागण्याचा अधिकार देखील नाही. महिला सुरक्षित नाहीत. मुली सुरक्षित नाही. शांतता-सुव्यवस्था राज्यात नाही. आमदारांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. महाराष्ट्राला नऊ लाख कोटीपेक्षा कर्जात बुडवलं. 30 टक्के कमिशनमध्ये बुडवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात कमिशन खात आहे, त्यावर हे किती खालच्या पातळीवर घसरले आहे, हे दिसते", अशी टोलेबाजी विजय वडेट्टीवार यांनी केली. तसंच लाडकी बहीण नुसतं करून होत नाही, तर तिची सुरक्षा देखील महत्त्वाची असते. या लाडक्या बहिणी सुरक्षा आम्ही करणार आहोत, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

Vijay Wadettiwar
Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचा शंखनाद, 20 नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी लागणार 'युती की आघाडी'चा निकाल

शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप

दरम्यान, राज्यपाल नियुक्त सात आमदारांवर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सकाळी साडेदहा वाजता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. वकील सिद्धार्थ मेहता हे शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने न्यायालयात याचिका दाखल केली.

या सात आमदारांनी घेतली शपथ

राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांपैकी 7 जणांची नावे निश्चित करत, या आमदारांचा शपथविधी आजच पार पडला. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना, तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com