rajiv kumar Sarkarnama
मुंबई

PC Election commission : महाराष्ट्र निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती, तब्बल 11 पक्षांशी चर्चा

Roshan More

PC Election commission : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक दोन दिवसांपासून महाराष्ट्रात आहे. आज (शनिवारी) निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या दोन दिवसांच्या दौऱ्यात 11 पक्षांची भेट घेत निवडणुकीबाबत त्यांचे मत जाणून घेतल्याचे सांगितले.

सणांचा विचार करून निवडणूक घ्या, अधिकाऱ्यांच्या बदल्या या निष्पक्ष पद्धतीने करा, पोलिंग एजंट हा त्याच पोलिंगमधील असावा,

पैशांच्या व्यवहारावर लक्ष द्या, पोलिंगवर मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे त्यामुळे पोलिंग बूथवर त्यांचा मोबाईल ठेवण्याची व्यवस्था असावी, असा सूचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

निवडणुक आयोगाने काँग्रेस, बसपा, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना (UBT), मनसे, सीपीए आदी पक्षांशी चर्चा केली.

महाराष्ट्रात किती मतदार?

9.59 कोटी मतदार महाराष्ट्रात आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे 19.48 लाख जण आहेत. महाराष्ट्रात 9 लाख नवीन महिला मतदार

शहरातील मतदान केंद्रावर 100 टक्के सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न असणार आहे. काही मतदान केंद्र महिला नियंत्रित करतील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT