Kolhapur Politics : शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांकडे कोणता आग्रह धरला?

Shiv Sena office bearers from Kolhapur met Uddhav Thackeray in the wake of assembly elections : कोल्हापूरमधील मतदारसंघाचा आढावा सांगत, विधानसभा निवडणुकींची तयारी माहिती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू आहे. यातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मातोश्रीवर जात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे नाक आहे.

मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, असा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला. याशिवाय जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी, शिरोळ, शाहुवाडी या पाच विधानसभा मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदारसंघातील पक्षाची स्थिती जाणून घेतली. यावेळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सचिव विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार आदी उपस्थित होते.

Kolhapur Politics
Shivsena UBT : काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस, 'मातोश्री'वर तक्रार

कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी, शिरोळ, शाहुवाडी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट दुरावला असला, तरी अजूनही निष्ठावंत शिवसैनिकांचे जाळे मतदारसंघात तयार आहे. त्यामुळे ही पाच मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहिले पाहिजेत, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर धरला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पाचवेळा आमदार निवडून आला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मिळालाच पाहिजे, असा आग्रह करण्यात आला. राधानगरी मतदारसंघात विद्यमान आमदार हे याच पक्षाचे होते.

Kolhapur Politics
Hasan Mushrif Vs Satej Patil: पालकमंत्री मुश्रीफांनी सतेज पाटलांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, '...हेच त्यांचं दुःखं'

'पक्षाचे मशाल चिन्ह हे घरोघरी पोचविण्यासाठी मोहीम हाती घ्या', असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले. कार्यकर्त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी चर्चा केली जाईल, असे पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. त्यानुसार गुरुवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com