Hitendra Thakur | Vinod Tawde Sarkarnama
मुंबई

Hitendra Thakur : तावडेंच्या आरोपांवर ठाकूर बरसले; म्हणाले, 'काल भिजलेल्या कोंबडीसारखे...' पाहा VIDEO

Vinod Tawde vs Hitendra Thakur controversy: भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेल आमदार हितेंद्र ठाकूर यांचा असल्याच्या आरोपावर ठाकूर यांनी हल्लाबोल केला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना मुंबई विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांची राळ अजून काही खाली बसलेली नाही. विनोद तावडे यांनी गोंधळातून सुटका करून घेतल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. त्यावर ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

"विनोद तावडे काल भिजलेल्या कोंबडीसारखे हॉटेलमध्ये बसून होते. त्यांना मुंबईला गेल्यावर कंठ फुटला", असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंना लगावला.

मुंबईतील विरारमधील विवांत हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे पकडल्याचा दावा आहे. भाजपचे (BJP) राष्ट्रीय नेते पैसे वाटताना पकडल्यावरून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशात उमटले. भाजप महायुती या धक्क्यातून सावरू शकली नाही. यातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास विवांत हॉटेलमध्ये रोखून ठरले होते. या गोंधळामुळे विनोद तावडे, उमेदवार राजन नाईक यांची चांगलीच कोंडी झाली. एकप्रकारे ते थिजले होते. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्त्यांना शांत करत तेथून विनोद तावडे यांना बाहेर काढले. हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला.

हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपकडूनच ही टीप मिळाली होती की, विनोद तावडे पैसे वाटत आहेत. ठाकूर यांच्या आरोपामुळे भाजपमध्ये अधिकच गोंधळ उडाला. यातून सावरताना विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला. 'विवांत हॉटेल ठाकूर यांच्या आहे. त्यांनी गोंधळ घालण्याचे नियोजन केले होते', असा तावडेंनी आरोप केला.

तावडेंच्या या आरोपांवर हितेंद्र ठाकूर यांनी हल्लाबोल चढवला. ठाकूर म्हणाले, "ते हॉटेल तावडेंनीच माझ्या नावावर करावे. काल जे भिजलेल्या कोंबडीसारखे हॉटेलमध्ये बसून होते. त्यांना मुंबईला गेल्यावर कंठ फुटला". खोटं बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही त्यांची सवय आहे, असा टोला देखील ठाकूर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT