Vinod Tawde : विनोद तावडेंना पैसे वाटताना पकडले? 'या' दोन महिला नेत्यांनी भाजप अन् निवडणूक आयोगाला सुनावलं! पाहा VIDEO

Vinod Tawde accused of distributing money: भाजप नेते राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना मुंबई विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावर महाविकास आघाडीतील नेते भाजपवर तुटून पडले आहेत.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Nala Sopara : विधानसभेसाठी उद्या 20 नोव्हेंबरला मतदान होत असून, छुपा प्रचाराला वेगाने सुरवात झाली आहे. यातच सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर निवडणूक आयोगापेक्षा विरोधकांची करडी नजर आहे. असाच एक खळबळजनक प्रकार मुंबईतील विरार मधून समोर आला असून, भाजपच्या यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना विरारमध्ये हिंतेद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्या दावा केल्याने त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

शिवसेना'UBT' पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या (Congress) खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपसह निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. सत्तेसाठी भाजप किती रसातळाला चालली आहे, यातील हा प्रकार असल्याची टीका महाविकास आघाडीकडून सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने या मुद्यांवरून पुरतं घेरल्याने भाजप महायुतीला मतदानापूर्वी काहीसा धक्का बसला आहे.

Vinod Tawde
Vinod Tawde : विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप? विरारमध्ये राडा, 'बविआ'कडून गंभीर आरोप

काँग्रेसच्या मुंबईतील खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप (BJP) नेते विनोद तावडे यांच्या या प्रकारावरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बॅग तपासणारे अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या बॅगा दिसत नाही. भाजप नेते विनोद तावडे यांना हिंतेद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विरारमध्ये पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार?"

Vinod Tawde
Election Crackdown: 4 हजारांवर प्रतिबंधक कारवाई, 31 कोटी जप्त; मतदान केंद्रावर मोबाईलला बॅन अन् ड्रोन वॉच

'भाजप खुलेआम पैसे वाटत आहे. लोकशाहीची खुलेआम हत्या होत आहे. तरी निवडणूक आयोग बघत बसतोय. फेक न्यूज, पैस वाटप, जातीय तेढ निर्माण करणारी विधाने, सत्तेत येण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करणाऱ्यांवर निवडणूक आयोगांकडून कारवाई का होत नाही', असा प्रश्न देखील वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

शिवसेना'UBT' पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विनोद तावडे यांच्या या प्रकारावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. 'पैसा फेक, इलेक्शन कमीशन तमाशा देख, जनता अब देशी तमाचा एक!', असा जबरदस्त टोला लगावला आहे. विनोद तावडे यांना रंगेहाथ पैसे वाटपाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. नेमका मतदानाच्या एक दिवस हा प्रकार झाल्याने राज्यात भाजप महायुतीला जोराचा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com