Nana Patole | Vinod Tawde Sarkarnama
मुंबई

Nana Patole on Vinod Tawde : भाजपची मान्यता रद्द करा; पटोले म्हणाले, 'त्या हाॅटेलात तावडेंचा विग घालून कोणी गेलं होत का?' पाहा VIDEO

Nana Patole Demands BJP’s Deregistration Over Vinod Tawde Incident: भाजप नेते राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना मुंबई विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपविषयी मोठी प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मुंबई विरारमधील पैसे वाटपाच्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यावर नाना पटोले यांनी भाजपची ही खोटारडी वृत्ती लोकांसमोर आल्याचा घणाघात केला.

"विनोद तावडे यांचे तिथं घर होते का? ते एका हाॅटेलमध्ये गेले होते. भाजप म्हणत असेल तर आमचा संबंध नाही, तर मग तिथे तावडेंचा कोणी विग घालून गेले होते का? भाजपची निवडणूक आयोगाने मान्यता रद्द करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

मुंबईतील बहुजन विकास आघाडीतील उमेदवार हितेंद्र ठाकूर यांच्या मुंबईतील विरार-नालासोपारा इथं विनोद तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पैसे वाटप केल्याचा आरोपावरून ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. मतदानाच्या एक दिवस अगोदर हा प्रकार घडल्याने भाजप महायुतीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीसह (MVA) भाजप विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर भाजप मित्रपक्षांची कोंडी झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावरून भाजपच्या प्रवृत्तीवर कडाडून हल्ला चढवला.

नाना पटोले म्हणाले, "भाजप म्हणते, आमचा काही संबंध नाही. विनोद तावडे, तर त्यांचे राष्ट्रीय नेते आहेत. खोटारडे लोकं, भाजप (BJP) यांच्यासारखे खोटारडे लोकं पाहिले नाहीत. सत्ता काबिज करण्यासाठी काहीही करायचे. यानिमित्ताने एक स्पष्ट झाली आहे की, महाराष्ट्राला अशा भानगडी आता कोणालाही मान्य नाहीत". महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराला पराभव करण्याचे लोकांनी ठरवले आहे. त्यामुळे पैसे वाटून कसे, तरी निवडून येता येईल का? हा त्याचाच एक प्रयत्न होता, असा घणाघात देखील नाना पटोले यांनी केला.

उल्टा चोर कोतवाल को डांटे

महाविकास आघाडी सत्ता येत नाही, म्हणून असे संभ्रम निर्माण केले जात आहेत, नागपूरमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला त्याचाच एक भाग होता, असा आरोप भाजपने केला आहे. यावर नाना पटोले म्हणाले, "उल्टा चोर कोतवाल को डांटे', अशी यांची वृत्ती आहे. विनोद तावडे यांचे घर होते का तिथे? ते एका हाॅटेलमध्ये गेले होते. काय काम होते तिथे? याचे उत्तर द्यावं. लोकांमध्ये भ्रम कोण तयार करत आहे, आता सर्वांना कळून चुकले आहे. विनोद तावडे हाॅटेलमध्ये गेले नव्हते, मग काय दुसरं कोणी त्यांचा विग घालून गेले होते का?"

तावडे खोट बोलत आहेत

मार्गदर्शन करण्याच्या विनोद तावडे यांचा दावा खोडून काढताना नाना पटोले म्हणाले, "निवडणुकीचा प्रचार संपला आहे. कशाला मार्गदर्शन करणार आहेत ते. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की, बाहेरच्या लोकांना त्या मतदारसंघात थांबता येणार नाही. सरळ-सरळ खोटं बोलत आहेत. खोटं बोला पण लोकांना पचलं पाहिजे".

भाजपची मान्यता रद्द

भाजप नेते प्रसाद लाड यांनी तावडे यांची बाजू घेताना, हे सर्व फेक आहे, असा दावा केला. त्यावर नाना पटोले म्हणाले, "प्रसाद लाड एक नंबरचा फेक माणूस होता. तो मुद्दा इथं चर्चेतला नाही. तावडे तिथं काय करत होते. कसलं मार्गदर्शन करत होते. या सर्व प्रकारात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा आणि भाजप पक्ष रद्द केला पाहिजे, मान्यता रद्द केली पाहिजे, अशी मागणी केली".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT