Mumbai News : भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना पकडल्यानंतर भाजप सर्वच बाजुने घेरला गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सर्व प्रकारावर खोचक प्रतिक्रिया दिली.
'राज्यात भाजप महायुतीचे हे जागोजागी चित्र आहे. परंतु महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही', असा विश्वास जयंत पाटील व्यक्त केला.
मुंबईतील विरार इथल्या हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात भाजपचे (BJP) राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले. या गोंधळाचे पडसाद राज्यात आज दिवसभर उमटले. मतदानाच्या अदल्या दिवशी हा प्रकार झाल्याने भाजप महायुतीवर महाविकास आघाडी आणि विरोधकांनी टिकेची झोड उठवत घेरलं.
भाजपच्या विनोद तावडे यांच्या प्रकारावर काँग्रेस (Congress), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या प्रमुखांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर खोचक टोलेबाजी केली. विरोधकांची ही टोलेबाजी भाजपच्या जिव्हारी लागेल अशीच आहे. याचा उद्याच्या मतदानावर काही परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
जयंत पाटील म्हणाले, "भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना रंगेहाथ पकडले. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता आहे".
निवडणूक आयोगाने या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारावर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. परंतु हाॅटेलमधील वेगवेगळ्या रुममधून तब्बल दहा लाख रुपये जप्त करण्यात आले. विरारमधील ज्या हाॅटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथे 'बविआ'चे नेते हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितिज ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व प्रकारांवर प्रेस घेतल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.