Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणावर पवारांचा निशाणा; आकडेवारीत तफावत आहे का?

Rohit Pawar booth wise polling statistics website Election Commission Chief Electoral Officer : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध न करण्यावरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

Pradeep Pendhare

Mumbai News : निवडणुकतील पराभवानंतर महाविकास आघाडी आणि विरोधक ईव्हीएमविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. तसेच अनेक मतदार केंद्रावरील मतदानाच्या आकडेवारीत तफावत समोर येत असल्याचा दावा आणि तक्रारी महाविकास आघाडीकडून होत आहेत.

यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कामकाजातील हालगर्जीपणावर हल्ला चढवला आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर आकडेवारी अपडेट नसल्याकडे लक्ष वेधत गंभीर आरोप करणारी पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभुतपूर्व असे यश मिळाले आहे. महायुतीला २३६ जागांवर विजय झाला आहे. या निकालाबाबत महाविकास आघाडीने शंका उपस्थित करण्यास सुरवात केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निवडणूक झाली लगेच फॉर्म-20 प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना आयोग सदरील आकडेवारी अजून जाहीर का करत नाही? असा प्रश्न केला आहे. बूथ निहाय सर्वांना आकडेवारी मिळणे अधिकार आहे. पण ही आकडेवारी निवडणूक (Election) आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर देखील विधानसभा 2024 हा पर्याय दिसत नाही, याकडे लक्ष वेधले आहे.

निकालात काही तफावत आहे का?

'निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी एवढ्या महत्त्वाच्या गोष्टींबाबत असा हलगर्जीपणा कसा काय दर्शवू शकतात? याशिवाय आकडेवारी आणि जाहीर करण्यात आलेला निकाल यात तफावत आहे का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेला पडले आहेत', असे देखील आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तरी आयोग लवकर सगळ्य अडचणी दूर करून आकडेवारी जाहीर करेल ही, अपेक्षा! देखील आमदार पवार यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढणार

दरम्यान, आमदार पवारांनी याकडे लक्ष वेधले असतानाच, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ईव्हीएमविरोधात लढाईचा, आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील काळात निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT