Antarwali Sarati : मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतून कोणाला मताधिक्य...

Antarvali Sarati vote margin impact of Manoj Jarange: घनसांगवी विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतून कोणाला मताधिक्य मिळाले, याची चर्चा आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली गावातून भाजप महायुती की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळाली याची चर्चा सुरू आहे.

अंतरवाली गाव हे घनसांगवी विधानसभा मतदारसंघात येते. इथं महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात थेट लढत झाली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदानाची आकडेवारी बूथनिहाय समोर येऊ लागलीय. कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, याची चर्चा रंगली आहे. यातच मराठा आरक्षणासाठी गेल्या दीड वर्षापासून महायुती (Mahayuti) सरकारबरोबर संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावातून कोणाला किती मते मिळाली याची चर्चा रंगली आहे. या निकालाच्या आकडेवारीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे गणित देखील आखली जात आहेत.

Manoj Jarange
Muslim Voters : मुस्लिम मतांचा किती परिणाम? काय सांगते आकडेवारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते राजेश टोपे यांना अंतरवाली सराटीतून सर्वाधिक 907 मते मिळालीत. दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार हिकमत उढाण यांना 213 मते मिळालेली आहेत. अंतरवाली सराटी ज्या विधानसभा मतदारसंघात येथे तिथं राजेश टोपे यांचा पराभव झाला आहे.

Manoj Jarange
Dhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपाला धनंजय चंद्रचूड यांचेही सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या दीड वर्षापासून महायुती सरकारबरोबर संघर्ष सुरू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीला मदत करत असल्याचा आरोप महायुतीच्या अनेक नेत्यांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगे आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला होता. आता निकालानंतर देखील पुन्हा मनोज जरांगे आणि महायुतीबरोबर संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

मनोज जरांगे यांचा पुन्हा संघर्षाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुढील महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी गावातून महायुती की महाविकास आघाडीच्या उमेदवारांला किती मते मिळाली याची चर्चा होती.

राजेश टोपे यांना अंतरवाली सराटीमधून मताधिक्य

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी गावातून सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार हिकमत उढाण यांना, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कावेरी खटके यांना 188 मते आणि अपक्ष उमेदवार सतीश घोडके यांना 381 मते मिळाली आहेत. मनोज जरांगे यांच्या गावातून राजेश टोपे यांना 526 मतांची आघाडी मिळाली आहे त्याचप्रमाणे अंतरवाली सराटी गावाच्या बाजूला असलेले वडगोद्री गाव देखील ओबीसी आंदोलनामुळे चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com