Suresh Dhas, Dhananjay Munde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : सुरेश धस, धनंजय मुंडेंसह 'या' 35 नेत्यांची आमदारकी धोक्यात! हायकोर्टातील 'त्या' याचिकेमुळे टेन्शन वाढलं

Petition in High Court against 35 MLAs : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन महिने उलटले आहेत. तरी देखील या निवडणुकीच्या निकालाबाबत विरोधकांकडून एव्हीएमचा मुद्दा उकरून काढला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 08 Jan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) निकाल जाहीर होऊन आता दोन महिने उलटले आहेत. तरी देखील या निवडणुकीच्या निकालाबाबत विरोधकांकडून एव्हीएमचा मुद्दा उकरून काढला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तरीही निवडणूक प्रक्रियेवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच आता विजयी झालेल्या जवळपास 35 आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक निकालाच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या आमदारांच्या विरोधात मुंबई (Mumbai) आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तरीही या याचिका निकाली निघेपर्यंत निकालाची चर्चा आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचं दिसत आहे. एकीकडे विजयी उमेदवारांच्या आमदारकीवर टांगती तलवार असतानाच तिकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 12 पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कोणत्या आमदारांविरोधात याचिका?

धनंजय मुंडे, सुरेश धस (Suresh Dhas), संजय शिरसाठ, तानाजी सावंत, संजय बनसोडे, हिकमत उढाण, संतोष दानवे, अर्जुन खोतकर, आमदार रमेश कराड, राजू नवघरे, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, मंजुळा गावित, नमिता मुंदडा या आमदारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तर महाविकास आघाडीमधील पराभूत उमेदवारांनी देखील निकाला विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर 11 जणांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखीव ठेवला आहे. गायकवाड यांनी मागील वर्षी मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात होते.

या निवडणुकीत गायकवाड यांचा विजय झाला आहे. मात्र, गायकवाड यांनी निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवरमुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश अनिवार्य असताना देखील निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून न केल्याचा दावा करत याच मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी याचिका दाखल केली आहे. मात्र, ही याचिका अर्थहीन असून आपण कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्याचा पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT