Pune Politics : "गेले 5 वर्ष भाजपनेत्यांवर..." ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशच होताच भाजपमधील खदखद चव्हाट्यावर

Shivsena UBT Ex Corporators join BJP : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 5 माजी नगरसेवकांनी मंगळवारी (ता.07) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा या नगरसेवकांच्या प्रवेशाला विरोध असतानाही त्यांना पक्षात प्रवेश दिल्याने आता भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येऊ लागली आहे.
Pune BJP Poliitics
Pune BJP PoliiticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 08 Jan : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षातील 5 माजी नगरसेवकांनी मंगळवारी (ता.07) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा या नगरसेवकांच्या प्रवेशाला विरोध असतानाही त्यांना पक्षात प्रवेश दिल्याने आता भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येऊ लागली आहे.

या पक्ष प्रवेशानंतर कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षप्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करणारे पोस्टर भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी लावल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच मंगळवारी ठाकरेंच्या शिवसेनेचतील 5 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे तसेच प्राची अल्हाट यांचा समावेश आहे. मात्र, माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

Pune BJP Poliitics
Ramgiri Maharaj Video : 'जन-गण-मन'ला राष्ट्रगीत मानण्यास रामगिरी महाराजांचा विरोध, 'त्या' वक्तव्यामुळे नवा वाद

ही नाराजी विविध माध्यमातून पुण्यातील (Pune) भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतंच काही दिवसापूर्वी एका भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्ष प्रवेशाबाबत वरिष्ठांचे कान टोचले होते. ज्या झाडाला दगड मारले जात होते त्या झाडाला आता गोड फळ लागली आहेत. ती फळ विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून नेत्यांनी खाल्ली.

मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी हे झाड जपलं त्यांच्यावरती महापालिका निवडणुकीला फळ चाखण्याची वेळ आली तेव्हा इतर पक्षातील लोकांना संधी देण्यात येत असल्याची खंत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, आता या पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजप कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस विशाल दरेकर यांच्या माध्यमातून फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Pune BJP Poliitics
Karad Politics : "एकमेकांच्या जिरवा जिरवीतून..."; कराडमधील दोन्ही पराभव जयंत पाटलांच्या जिव्हारी, भर स्टेजवर उदयदादा अन् बाळासाहेब पाटलांना सुनावलं

या फ्लेक्सवर "दुश्मनी जमकर करो... दुश्मनी जमकर करो... लेकिन यह एहसास रहे, जब दोस्त बनजाये तो शरमिंदा ना हो..." असा मजकूर फ्लेक्सवर छापण्यात आला आहे. या माध्यमातून झालेल्या पक्षप्रवेशाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना विशाल दरेकर म्हणाले "ज्यांचे पक्ष प्रवेश घडवून आणण्यात आले त्या माजी नगरसेवकांनी गेली पाच वर्ष केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्याचं काम केलं.

आता राज्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर केवळ आपली घरे वाचवण्यासाठी हे लोक पक्ष प्रवेश केला आहे. आम्ही स्थानिक पातळीवर काम करत असताना अनेकदा विरोधाची भूमिका घेण्यात आली. ज्या भागातून या नेत्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. त्या ठिकाणी भाजपकडून अनेक कार्यक्षम उमेदवार असतानाही हे प्रवेश घडवून आणण्यात आले तसेच याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत देखील विचारात घेण्यात आलं नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com