Avinash Jadhav Sarkarnama
मुंबई

Avinash Jadhav : महाविकास आघाडीनंतर मनसेचाही EVM वर संशय, राज ठाकरे लवकरच मांडणार भूमिका?

MNS Questions EVM Credibility: मनसे सैनिकांनी कोव्हिडमध्ये काम केले. गेली पाच वर्ष काम करत होते. मात्र जे आमदार लोकांना 10-10 वर्ष भेटले नाहीत ते लाखाच्या फरकाने निवडून आले. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारला.

Roshan More

MNS News : महायुतीला विधानसभा निवडणुकीत तब्बल 230 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीने हे यश EVM मशीन सेट करून मिळवल्याचे आरोप केले आहेत. न्यायालयाने EVM वरील याचिका फेटाळली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी महायुतीला मिळालेले यश हे EVM शिवाय शक्यच नव्हते. EVM ने घात केला, असे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे हे आपली भूमिका लवकरच जाहीर करतील, असे देखील जाधव यांनी सांगितले आहे.

अविनाश जाधव म्हणाले, मनसे सैनिकांनी कोव्हिडमध्ये काम केले. गेली पाच वर्ष ते काम करत होते. मात्र जे आमदार लोकांना 10-10 वर्ष भेटले नाहीत ते लाखांच्या फरकाने निवडून आले. हे कसं शक्य आहे. ईव्हीएमशिवाय हे शक्य नव्हते. येवढे मोठे यश मिळूनही भाजपमध्ये आनंद साजरा केला जात नाही.

विरोधी पक्ष एकत्र येऊनही काही होऊ शकत नाही. यंत्रणेने सीट आधीच सेट केल्या होत्या. भाजप विरोधात लाट दिसत होती. मात्र, त्यांनी पिच्चर तयार केले लाडकी बहीण, कटेंगे तो बटेंगे कारण त्यांना मोठ्या यशाला कारण पाहिजे होते, असे देखील अविनाश जाधव म्हणाले.

मतदान EVM भाजपच्या घशात

मतांमध्ये तफावत आढळते आहेत. लोक विचारत आहेत आम्ही दिलेल्या मताचे काय झाले? हे मत ईव्हीएमच्या घशात गेले. भाजपच्या घशात गेले. फक्त तीन चार देशात EVM वर मतदान होते. अमेरिकासारखा देशही बॅलेट पेपरवर मतदान घेतो मग इथे कशाला EVM पाहिजे, असा प्रश्न जाधव यांनी विचारला.

निवडणुका लढायचा की नाही

दाद कोठे मागायची. या निवडणुकीत मनसेची, महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झाली. न्यायालय त्यांच, निवडणूक आयोगही त्यांचा मग न्याय कोणाकडे मागायचा? पुढील निवडणुका आम्ही लढायच्या की नाही, असा प्रश्न मला पडतो आहे, असा देखील अविनाश जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT